PGCIL Apprentice Recruitment 2021 | पॉवरग्रीड कॉर्पोरेशनमध्ये 1110 पदांची भरती, परीक्षेशिवाय नियुक्ती; जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  PGCIL Apprentice Recruitment 2021 | पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये (PGCIL Apprentice Recruitment 2021) नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. तब्बल 1110 पदांवर अप्रेंटिस भरती होणार आहे. अधिकृत माहितीनुसार, पॉवरग्रीड कॉर्पोरेशनच्या गुरुग्राम, फरीदाबाद, जम्मू, लखनऊ, पटना, कोलकाता, शिलाँग, भुवनेश्वर, नागपूर, वडोदरा, हैदराबाद आणि बंगळुरु येथे विविध पदांवर ही भरती होणार आहे.

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये ही भरती एक वर्ष कलावधीसाठी ट्रेनी पोस्टसाठी (Trainee Post) करण्यात येणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी powergrid.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज (Apply online) करु शकतात. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2021 आहे. तर ऑनलाइन अर्ज 21 जुलै 2021 पासून जमा केले जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

– आयटीआय (ITI) अप्रेंटिस इलेक्ट्रिकलसाठी उमेदवार इलेक्ट्रिकलमधील आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

– डिप्लोमा (Diploma) अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल आणि सिव्हील) साठी विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिकल आणि सिव्हील इंजिनिअरींगमधील डिप्लोमा असणं आवश्यक आहे.

– ग्रॅज्युएट (Graduate) अप्रेंटिस करण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचं बीई, बी.टेक आणि बीएससी इंजिनिअरिंग झालेलं असेल ते इलेक्ट्रिकल, सिव्हील, इलेक्ट्रॉनिक्स, टेलीकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्समध्य पदवीधर असणे आवश्यक आहे.

– HR एक्झ्युकेटीव्हसाठी मानव संसाधनातील एमबीए, एमएसडब्ल्यू, पार्सनल मॅनेजमेंट आणि पर्सनल मॅनेजमेंट दोन वर्षाचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम.

स्टायपेंड

आयटीआय अप्रेंटिस -11 हजार

डिप्लोमा अप्रेंटिस – 12 हजार

ग्रॅज्युएट अप्रेंटिस -15 हजार

HR एक्झीक्युटीव्ह – 15 हजार

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड त्यांच्या संबंधित ट्रेडमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.
त्यासाठी कोणत्याही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.
एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Job Alert | राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर इथे होणार मोठी भरती ! परीक्षा नाही थेट मुलाखत, जाणून घ्या मुलाखतीची तारीख