फार्मासिस्ट बांधवांचा ‘कोरोना योध्दा’ प्रमाणपत्र देऊन गौरव !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   श्री.छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेचे सितावाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी येथे दि.२५ सप्टेंबर रोजी मध्ये जागतिक औषधनिर्माता दिवस कोवहीड-१९ च्या पार्श्वभुमीवर योग्य ती खवरदारी घेऊन उत्साहात साजरा करण्यात आला.फार्मासिस्ट हा डॉक्टर व रूग्ण यांच्यातील एक महत्वाचा दुवा म्हणून काम करतो. समाजाला निरोगी ठेवण्यासाठी अहोरात्र ते आपले योगदार देत असतात. त्याचबरोबर रूग्णांचे मनोवल वाढविण्याचे कामही फार्मासिस्ट मंडळींकडुन केले जाते.

कारोना संकटकाळात शिरूर शहरातील फार्मासिस्ट बांधवांनी रूग्णांना वेळेवर औषधे मिळावी,
औषधांचा पुरवठा अखंड रहावा यासाठी जोखिम पत्करून सेवा दिली आहे . त्यांनी केलेल्या उल्लखनीय कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कॉलेजच्यावतीने सर्वांचा “कोरोना योध्दा” प्रमाणपत्र देऊन गौरव
करण्यात आला.

सदर कार्यक्रमास शिरूर शहरातील बाबाजी गलांडे,चोथमल कोठारी,पुष्पराज कोळपकर,महेश गांधी,शिवाजी चव्हाण,रामा शितोळे,नवनाथ वाखारे,सचिन गाडे,राहुल वाघमारे,अतुल शेवाळे आदी उपस्थित होते. यावेळी बाबाजी गलांडे यांनी फार्मासिरट बांधवांना शासनातर्फे विमा संरक्षण मिळावे अशी आशा व्यक्त केली. कॉलेजच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्रजी थिटे सचिव धनंजयजी थिटे यांनी सर्वाना
जागतिक औषधनिर्माता दिवसाच्या शुभेच्छा दिल्या .

बी . फार्मसीचे प्राचार्य डॉ.द्वारकादास बाहेती यांनी सर्व शासकिय नियमांचे पालन करून आपले कर्तव्य पार पाडण्यास सांगितले. डि . फार्मसीचे प्राचार्य डॉ.अमाेल शहा यांनी सर्वांना स्वत:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले . प्रा.विशाल कारखिले सर यांनी सर्वांचे आभार मानले.