#377 बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी पत्नीचा काढला काटा ; पतीला जन्मठेप 

लंडन : वृत्तसंस्था – अत्तापर्यंत अशा काही  घटना घडल्या आहेत की गर्लफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी पतीने पत्नीला मार्गातून दूर केले आहे. मात्र लंडन मध्ये  एका तरुणाने बॉयफ्रेंड सोबत पळून जाण्यासाठी पत्नीला आपल्या मार्गातून कायमचे दूर केले आहे. हा तरुण भारतीय वंशाचा आहे. जेसिका पटेल (वय ३४ ) असे  हत्या झालेल्या विवाहितेचे  नाव असून तिच्या हत्येप्रकरणी पती मितेश पटेलला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

इंग्लंडमधील भारतीय वंशाच्या विवाहितेच्या हत्येचं रहस्य पोलिसांनी  उलगडलं आहे.  बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी समलिंगी तरुणानेच  पत्नीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पती  मितेश पटेलला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

जेसिका पटेल (वय ३४ ) यांचा मृतदेह इंग्लंडमधील राहत्या घरात मे महिन्यामध्ये आढळला होता. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या दरोडाखोरांनी पत्नीची हत्या केली, असा बनाव पतीने सुरुवातीपासून केला.

पती मितेशनेच जेसिका यांची गळा आवळून हत्या केल्याचं न्यायालयात निष्पन्न झालं होतं. गे डेटिंग अॅपवर ओळख झालेल्या तरुणासोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक होण्यासाठी तरुणाने पत्नीचा काटा काढल्याचं समोर आलं आहे.

मितेश पटेल हा एक फार्माशिष्ट आहे. तो समलैंगिक असल्याचं पत्नी जेसिकाच्या लक्षात आल्यानंतर पटीने तिची हत्या केली. विशेष म्हणजे पत्नीच्या नावे काढलेला २० लाख डॉलर्सचा विमा मिळवून बॉयफ्रेंड डॉ. अमित पटेलसोबत नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचा आरोपी मितेशचा विचार होता.

पत्नीची हत्या कशी करावी याबाबत इंटरनेट सर्च –‘पत्नीची हत्या कशी करावी?’, ‘इन्सुलिन ओव्हरडोस’, ‘किती प्रमाणात मिथेडॉन तुमचा जीव घेतं?’, ‘यूकेमध्ये काँट्रॅक्ट किलर’ असे इंटरनेट सर्चही मितेशने केले होते. जुलै 2015 मध्येच ‘तिचे दिवस भरले आहेत’ असा मेसेज मितेशने अमितला केला होता. मितेशचे अनेक पुरुषांसोबत अनैतिक संबंध असल्याचा दावा केला जात आहे.