‘सिरम’च्या ‘कोरोना’वरील लशीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी पुण्यात सुरु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाविरुद्ध अद्याप कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध झालेली नाही. अनेक देश कोरोनाविरुद्धची लस तयार करण्यात व्यस्त आहे. तर काही कंपन्यांच्या लशीची चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे. सिरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाने ऑक्सफर्डच्या मदतीने कोरोनाला प्रतिबंध करणारी लस तयार करत आहे. या लशीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरु झाली आहे. या लशीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरु झाली असल्याची माहिती ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी एका वृत्तसंस्थेला दिली आहे. डॉ. मुरलीधर तांबे यांनी सांगितले की, 150 ते 200 जणांना आम्ही ही लस दिली आहे. आता आम्ही या सगळ्यावर लक्ष ठेवून असल्याची माहिती डॉ. तांबे यांनी दिली.

सिरम इंस्टिट्युट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषध निर्मिती करणारी कंपनी आहे. जगातली एक उत्तम संस्था असा या संस्थेचा लौकिक आहे. जगभरात सध्या कोरोनावरच्या अनेक लशींवर काम सुरु आहे. तर सिरम इंस्टिट्युट ऑक्सफर्डच्या मदतीने कोरोनाला प्रतिबंध करणारी लस तयार करत आहे. या लशीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला पुण्यात सुरुवात झाली आहे.

सध्याच्या घडीला संपूर्ण जगाला कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाचा सामना करावा लागत आहे. अशात सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे या रोगाला प्रतिबंध करणारी लस पुण्यातील सिरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाने ऑक्सफर्डच्या मदतीने तयार करण्यास सुरुवात केली आहे. ही लस आल्यानंतर ती सुरक्षित असावी आणि सामान्य लोकांना परवडणारी असावी हा देखील सिरमचा मानस आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या पार पडल्या आहेत. आता तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या सुरु करण्यात आल्या आहेत. संपूर्ण देश कोरोना संकटाचा सामना करत असताना ही बाबत निश्चितच दिलासा देणारी आहे.