काय सांगता ! होय, हायकोर्टातील शिपायाच्या पदासाठी चक्क डॉक्टर, इंजिनियर आणि पीएचडीधारकांचे अर्ज

अहमदाबाद : वृत्तसंस्था – दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या वाढत आहे. यामुळे उच्च शिक्षण घेतलेल्यांना शिपाई पदासाठी अर्ज करण्याची वेळ आली आहे. गुजरात उच्च न्यायालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती परीक्षेसाठी पीएडीधारकांसह डॉक्टर, बीटेक इंजिनीयर यांच्यासारख्या अनेक उच्चशिक्षितांनी अर्ज केले होते. मासिक 30 हजार रुपयांच्या पगारासाठी 19 पीएचडीधारकांनी अर्ज केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

नोकऱ्या मिळत नसल्याने बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. सध्या गुजरात उच्च न्यायालयातील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या 1149 जागांची भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी तब्बल 1,59,278 अर्ज आले होते. त्यात पदवीधारक, एमबीए, बीटेक ग्रॅज्युएट्सची संख्याही अर्जदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर होती.

धक्क्कादायक बाब म्हणजे उच्च न्यायालयात न्यायाधीश होण्यासाठी एलएलएम पदवी लागते. मात्र एलएलएम पदवी असलेल्या अनेकांनीदेखील शिपायाची नोकरी स्वीकारली आहे. तसेच या परीक्षेत सात डॉक्टर उत्तीर्ण झाले. त्यांनी ही नोकरीदेखील स्वीकारली. त्यामुळे बेरोजगारी किती वाढली याची याची भीषण वास्तविकता स्पष्ट होते.

Visit : Policenama.com 

You might also like