दहशतवादी संघटनेत प्रवेश केलेल्या पीएचडी स्कॉलरचा खात्मा

दहशतवादी संघटनेत प्रवेश केलेल्या पीएचडी स्काॅलरचा खात्मा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मनन बशीर वाणी असं या काश्मिरी तरुणाचं नाव आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील पीएचडी शिक्षण अर्धवट सोडून हा तरुण दहशतवादाच्या वाटेवर गेल्याचे समोर येत आहे. मनन बशीर वाणी या काश्मिरी तरुणाने ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेत प्रवेश केला होता. कूपवाडा जिल्ह्यातील हंडवारामध्ये एसओजी आणि सैन्य दलातील 30 राष्ट्रीय रायफल गटाच्या जवानांची गुरुवारी धुमश्चक्री झाली. यामध्ये मनन बशीर वाणी आणि आशिक हुसैन झरगर या दोघा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’88ffee9a-ce11-11e8-9dad-e1bfe8b466be’]