Phenofibric acid | ब्रिटिश संशोधकांचा दावा- कोलेस्ट्रॉलच्या औषधाने 70% पर्यंत कमी होऊ शकतो Corona व्हायरसचा धोका

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Phenofibric acid | कोलेस्ट्रॉल कमी करणारे औषध फेनोफायब्रेट (Fenofibrate) ने कोरोनाच्या संसर्गाचा (Coronavirus) धोका 70 टक्केपर्यंत कमी होऊ शकतो, असा दावा युकेच्या बर्मिंगहम युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केला आहे. संशोधकांचा दावा आहे की, फेनोफायब्रिक अ‍ॅसिड कोविडचा संसर्ग कमी करते (Phenofibric acid reduces covid infection). प्राथामिक क्लिनिकल ट्रायलमध्ये हे सिद्ध झाले आहे.

औषध सहज उपलब्ध आहे आणि स्वस्त
फेनोफायब्रेट एक ओरल ड्रग आहे. याचा वापर ब्लडमध्ये कोलेस्ट्रॉल आणि लिपिड कंट्रोलसाठी केला जातो. जगभरात हे औषध सहजपणे उपलब्ध आहे आणि स्वस्त सुद्धा आहे. कोलेस्ट्रॉलच्या रूग्णांवर औषधाचा वापर करण्यासाठी जगभरातील बहुतांश ड्रग अथॉरिटीनी सुद्धा यासाठी मंजूरी दिली आहे.

व्हायरसला पसरण्यापासून रोखते
संशोधक एलिझा व्हिन्सेजी यांचे म्हणणे आहे की, संशोधनाचे निष्कर्ष सांगतात की, फेनोफायब्रेटमध्ये कोरोनाचा संसर्ग गंभीर होण्यापासून रोखण्याची क्षमता यात आहे. हे व्हायरसला पसरण्यापासून रोखण्यात मदत करते.

व्हॅक्सीन घेता येत नाही त्यांना उपयोगी
संशोधकांचे म्हणणे आहे की, सर्व क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाल्यानंतर हे औषध त्या लोकांना सुद्धा दिले जाऊ शकते ज्यांना व्हॅक्सीन दिली जाऊ शकत नाही. जसे की- मुले आणि हायपर इम्यून डिसऑडर्सला तोंड देणारे रूग्ण.

कोरोनाच्या ओरिजनल स्ट्रेनवर केला प्रयोग
शास्त्रज्ञांनी मागील वर्षी लॅबमध्ये कोरोनाच्या ओरिजनल स्ट्रेनने संक्रमित झालेल्या पेशींवर फेनोफायब्रेट औषधाचा परिणाम पहिला.
रिझल्टमध्ये 70 टक्केपर्यंत संसर्गाचा धोका कमी झाल्याचे आढळले.

 

अल्फा, बीटा स्ट्रेनवर परिणामकारक

अमेरिका आणि इस्त्रायलच्या हॉस्पिटलमध्ये भरती कोरोनाच्या रुग्णांवर या औषधाची ट्रायल केली जात आहे.
शास्त्रांचे म्हणणे आहे की, हे औशध कोरोनाच्या अल्फा, बीटा स्ट्रेनवर सुद्धा परिणामकारक आहे.

डेल्टा स्ट्रेनवर संशोधन सुरू
धोकादायक डेल्टा स्ट्रेनवर सुद्धा हे औषध परिणामकारक आहे का,
याचा शोध शास्त्रज्ञ सध्या घेत आहेत. याचे निष्कर्ष लवकरच येतील.

Web Title :- Phenofibric acid | britain british researchers says oral drug fenofibrate may cut sars cov 2 infection by 70 percent

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Zika Virus | पुणे जिल्ह्यातील ‘झिका’ची अतिसंवेदनशील 79 गावांची जाहीर, वाचा लिस्ट

Jica Project Pune | भाजपच्या अपयशामुळे जायका प्रकल्पात पुणेकरांवर 600 कोटीचा भुर्दंड; पाठ थोपटून घेण्यापेक्षा भाजपने जाब द्यावा

Intermittent Fasting | फास्टिंगमुळे आतड्याच्या इन्फेक्शनचा धोका कमी, जाणून घ्या काय म्हणतात एक्सपर्ट