11 वर्षाच्या मुलीकडं नव्हते बुट, ‘बॅन्डेड’ बांधून धावली 3 स्पर्धेत, ‘गोल्ड’ जिंकले

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – सध्या 11 वर्षाच्या एका अ‍ॅथलिटचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या मुलीने तिने पायात बॅंडेज बांधून शूज नसताना विजय मिळवला. एका वृत्तानुसार फिलीपींसमध्ये इलोइलो प्रांतात एका शाळात इंटर स्कूल अ‍ॅथलीट्स मीटचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रिया बुलोसने देखील भाग घेतला. रियाने 400, 800 आणि 1500 मीटर धावण्याचा स्पर्धेत भाग घेतला होता. तिने तीन कॅटेगिरीमध्ये विजय मिळवला. रियाच्या या सफलतेमुळे तिला सुवर्ण पदक मिळाले.

रियाच्या या विजयाची माहिती प्रांतचे स्पोर्ट्स कौंसिल मीटचे कोच प्रेडीरिक बी वैनेजुएवा यांनी सोशल मिडियावर हा फोटो शेअर केला. फोटोमध्ये दिसते की रियाने शूज घातलेले नाही. तिने शूज घालण्याचा ऐवजी पायात बँडेज घातले आहे.रियाच्या कोच यांनी शेअर केलेल्या फोटोनुसर रियाना शुज घातलेले नाहीत. रियाने जो बँडेज लावला आहे त्यावर नायकीचे चिन्ह आहे. तिने ते स्वत: केले आहे.

एका कंपनीने ऑफर केले शूज –
प्रेडीरिकची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी रियाला शुज ऑफर केले. एका फेसबूक यूजरने नायकी कंपनीला पुढे येण्यास सांगितले. त्यानंतर एका स्टोर मालकाने ट्विटर यूजरला अ‍ॅथलिटचा नंबर मागिलता आणि रिया पर्यंत मदत पोहचवली.
रियाचा हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला त्यानंतर लोकांनी तिची प्रशंसा केली. यूजर्सने रियाच्या साहसाचे कौतूक केले.