‘या’ कंपनीनं ‘कोरोना’पासून बचाव करण्यासाठी तयार केला ‘खास ‘बॉक्स, सर्वकाही मिनिटात करणार ‘डिसइन्फेक्ट’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरस पसरण्यापासून रोखण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ हात सतत सॅनिटाइज करण्याचा सल्ला देत आहेत. तर, बाहेरून आल्यानंतर वॉलेट, की-रिंग, कार आणि बाईकच्या चाव्या आणि एवढेच नव्हे, तर कपडे सुद्धा ताबडतोब सॅनिटाइज करण्यावर जोर दिली जात आहे. भाज्या आणि फळांद्वारे कोविड-19 पसरण्याची सुद्धा अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या सर्वाला तोंड देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स गुड्स निर्माता कंपनी फिलिप्सने एक खास उपकरण सादर केले आहे.

कंपनीचा दावा, 99.99 टक्के व्हायरस होतील नष्ट
फिलिप्सच्या या उपकरणाच्या मदतीने तुम्ही मुलांच्या खेळणीपासून भाजी, फळे, चाव्या, वॉलेट, दूध, दहीची पॅकेट, पॉवर बँक, मोबाइल आणि लॅपटॉपपर्यंत सर्व काही मिनिटात सहज सॅनिटाइज करू शकता. फिलिप्सने रोजच्या वापरातील वस्तू सॅनिटाइज करण्यासाठी यूवी-सी बॉक्स सादर केला आहे.

कंपनीचा दावा आहे की, ज्या वस्तू सामान्य सॅनिटायजर किंवा साबणाने स्वच्छ करता येत नाही, त्या या उपकरणात ठेवून काही मिनिटातच व्हायरस मुक्त करता येतात. यामुळे 99.99 टक्के व्हायरस नष्ट होतात.

या वस्तूंना सॅनिटाइज करण्यास लागतील अवघी 3 ते 5 मिनिटे
कंपनीने सांगितले की, या बॉक्समध्ये दूधाचे एक पॅकेट, 2-3 भाज्या, चाव्या, कि-रिंग, घड्याळ, चष्मा, छोटी खेळणी, फणीला सॅनिटाइज करण्यासाठी 2 मिनिटे लागतील. याशिवाय दूधाचे दोन पॅकेट, वांगी, कोबी, भोपळा यासारख्या मध्यम आकाराच्या भाज्या, फळे, मोबाइल फोन, पॉवर बँक, रिमोट, पाणी बॉटल, सलूनची उपकरणे आणि वॉलेट सॅनिटाइज करण्यास अवघी 3 मिनिटे लागतील.

यूवी-सी बॉक्समध्ये दूधाची 3 पॅकेट एकाच वेळी सॅनिटाइज करण्यास 5 मिनिटे लागतात. तर, मध्यम 5-6 छोट्या आकाराच्या भाज्या, फळे, आयपॅड/टॅबलेट, मध्यम आकाराची खेळणी आणि सलून ची उपकरणे सॅनिटाइज करण्यासाठी 5 मिनिटे लागतील.

7,990 ते 11,990 रुपये यूवी-सी बॉक्सची किंमत
मोठी उपकरणे आणि भाज्या व्हायरसमुक्त करण्यासाठी यूवी-सी बॉक्समध्ये सुमारे 8 मिनिटासाठी ठेवाव्या लागतील. मध्यम आकाराच्या 8-10 भाज्या, फळे, दूधाची 4 पॅकेट, हँड बॅग, लॅपटॉप आणि सलूनची मोठी उपकरणे सॅनिटाइज करण्यास 8 मिनिटे लागतील. या बॉक्समध्ये यूवी लाईटच्या लो प्रेशर लॅम्पचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये डिसइन्फेक्ट करण्यात आलेल्या प्रॉडक्टच्या क्वालिटीवर कोणताही परिणाम होणार नाही. फिलिप्स यूवी-सीच्या खरेदीवर 1 वर्षाची ऑनसाईट वॉरंटी देत आहे.

परंतु, बॉक्समध्ये लावलेल्या यूवी-सी लॅम्पवर कोणतीही वॉरंटी दिली जात नाही. जर पॉवर ऑन असेल आणि तुम्ही बॉक्सचे डोअर उघडल्यास ऑटो कट होईल. यामुळे यूजरला यूवी रेंजच्या एक्सपोजरमुळे होणारे नुकसान होणार नाही. हा बॉक्स तीन साईजमध्ये उपलब्ध आहे. यांची किंमत अनुक्रम 7,990 रुपये, 9,990 रुपये आणि 11,990 रुपये ठेवली आहे.