PMO मधून फोन ; संजय धोत्रेंना मंत्रिपद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीएचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा संजय धोत्रे यांनी दुसऱ्यांदा प्रभाव केला. संजय धोत्रे हे यंदा खासदार आहेत. त्यांना दुपारी पंतप्रधान कार्यालयातून फोन आल्यामुळे, त्यांचे मंत्रिपद निश्चित झाल्याचे उघड झाले आहे. १९९९ ते २००४ पर्यंत प्रकाश आंबेडकर हे खासदार होते. त्यानंतर २००४ ते आतापर्यंत भाजपचे संजय धोत्रे हे अकोल्यावर वर्चस्व गाजवत आहेत.

PMO मधून धोत्रेंना फोन

PMO मधून धोत्रेंना अमित शहा यांचा फोन आला ते जास्त बोलले नाहीत फक्त म्हणाले आपको शपथ लेनी है , मला आनंद झाला शेतकाऱ्यांकरिता मी काम करत आलोय, त्यामुळे कृषी मंत्रालय मिळालं तर आनंद होईल असे धोत्रे यांनी माध्यमांशी बोलताना संगितले.

धोत्रेंचे मंत्रिपद निश्चित

अकोल्याचे भाजपचे खासदार संजय धोत्रे यांना तीन महिन्यापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. राज्यभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु होती. मात्र संजय धोत्रे यांचं तिकीट कापण्याच्या तणावातून त्यांना हा हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती होती. तिकीट कापण्याची शक्यता, प्रकाश आंबेडकरांचा पराभव अशा पार्श्वभूमीनंतर संजय धोत्रे यांना मंत्रिपद निश्चित झालं आहे. धोत्रे यांनी यंदा प्रकाश आंबेडकरांचा अडीच लाख मतांनी पराभव केला.