Phone Tapping Case | फोन टॅपिंग प्रकरण! देवेंद्र फडणवीसच मुख्य साक्षीदार; राज्य सरकारचा न्यायालयात दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फोन टॅपिंग (Phone Tapping Case) च्या गोपनीय अहवालाची कागदपत्रे केंद्रीय गृह मंत्रालयाकडे (Union Home Ministry) आहेत. ती कागदपत्रे मिळवण्यासाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) न्यायालयाचे दार ठोठावले आहे. त्या याचिकेवर महा दंडाधिकारी एस. भाजीपाले (S Bhajipale) यांच्या न्यायालयासमोर सुनावणी सुरु आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या एका मुलाखतीचा हवाला देत त्यांचीही फोन टॅपिंग प्रकरणी (Phone Tapping Case) साक्ष नोंदवणार असून त्यांना समन्स पाठवले असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. त्याचबरोबर अहवाल फुटीची माहिती फडणवीसच देऊ शकतात, तेच आमचे मुख्य साक्षीदार असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. दरम्यान, या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन करण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यावेळी राज्य गुप्तचर विभागाच्या SID (State Intelligence Department) तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, ज्येष्ठ नेते तसेच सरकारी अधिकार्‍यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग (Phone Tapping Case) केल्याचा आणि त्याबाबतची गोपनीय माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवल्याची तक्रार करण्यात आली होती. ती कागदपत्रे आणि गॅजेट परत देण्यासाठी केंद्रीय गृह सचिवांना (Union Home Secretary) तपासी अधिकारी एसपी नितीन जाधव (SP Nitin Jadhav) यांनी 3 मे ते 23 सप्टेंबरदरम्यान चार पत्रे पाठवली परंतु, त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नसल्याची माहिती विशेष सरकारी वकील अजय मिसार (Special Public Prosecutor Ajay Misar) यांनी न्यायालयात दिली.

 

त्यानंतर न्यायालयाने कागदपत्रे आणि पेन ड्राईव्ह त्यांच्याकडे असल्याचा निष्कर्ष तुम्ही कोणत्या आधारावर काढला आहे, अशी विचारणा केली. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांनी मार्चमध्ये एका मुलाखतीत मुंबईत गृह सचिवांना कागदपत्रे आणि गॅजेट्स (उपकरणे) दिली असल्याचे वक्तव्य केले असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. विरोध पक्षनेत्यांचा (Opposition leader) जबाब नोंदवला आहे का असा सवाल उपस्थित करत तुमचा दावा सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे आहेत का अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यावेळी निसार यांनी फडणवीस हेच आमचे प्रमुख साक्षीदार आहेत. तेच याबाबत खुलासा करू शकतात, असे सांगितले.

Web Title :- Phone Tapping Case | Phone tapping case! Devendra Fadnavis is the main witness; State government claims in court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bombay High Court | ‘रात्री महिलेच्या खाटेवर बसून तिच्या पायांना स्पर्श करणे म्हणजे विनयभंगच’

Shani Dev | 2022 मध्ये अडीच वर्षानंतर ’शनी’ बदलणार ‘रास’, जाणून घ्या कुणाला सुरू होईल ‘अडीचकी’ आणि ‘साडेसाती’

Bathroom Stroke | हिवाळ्यात येणाऱ्या बाथरूम स्ट्रोकबद्दल तुम्हाला माहिती आहे?, जाणून घ्या कशी घ्यावी खबरदारी

Pune Crime | पुणे ग्रामीणची मोठी कारवाई ! यवत पोलिसांकडून पाटस परिसरात 50 लाखांच्या गांजासह 7 पुरुष आणि 5 महिलांना अटक

NPS Traders | राष्ट्रीय पेन्शन योजना देते छोट्या व्यापार्‍यांना वृद्धत्वात पेन्शनचा आधार, जाणून घ्या सरकारी योजनेचा कसा घ्यायचा लाभ