Phone Tapping Case | 2019 मध्ये संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचेही फोन टॅप ?’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Phone Tapping Case | राज्यात अनेक प्रकरणावरून वातावरण तापलेलं असताना आणखी एका नव्या प्रकरणाची भर पडली आहे. फोन टॅपिंग प्रकरणात (Phone Tapping Case) गुन्हा दाखल झालेल्या पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. याआधी ज्या राजकीय नेत्यांचे फोन टॅप झाले होते. अशातच आणखी दोन नेत्यांचे फोन टॅप झाल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

 

भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये (NCP) आलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचेही फोन टॅप झाल्याचा गुन्हा (Phone Tapping Case) दाखल करण्यात आला आहे. फोन टॅपिंग प्रकरणातील हा तिसरा गुन्हा असून कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये (Colaba Police Station) हा गुन्हा दाखल करण्यात आला.

 

2019 मध्ये संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन दोन महिने टपिंगसाठी लावण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. राजकीय स्वार्थ साधण्याच्या हेतूने हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप (Allegations) रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आला आहे.

दरम्यान, ज्येष्ठ आयपीएस रश्मी शुक्ला यांच्यावर राजकीय पक्षातील नेत्यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
या प्रकरणाची चौकशी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडेंच्या (DGP Sanjay Pandey) अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नियुक्त केली होती.
त्यानंतर या समितीने सरकारला जो अहवाल दिला त्यानुसार पुण्यातील बंडगार्डन (BundGarden Police Station) पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), राज्यमंत्री बच्चू कडू (Minister of State Bachchu Kadu),
भाजप नेते संजय काकडे (Sanjay Kakade) आणि माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅप झाले होते.
रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप केले ते भाजप (BJP) सरकारच्या काळात केले होते.

 

Web Title :- Phone Tapping Case | phone tapping of sanjay raut and eknath khadse for 2 months

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा