Phone Tapping Case | फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी होणार, राज्य सरकारकडून 3 सदस्यीय समिती स्थापन

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी फोन टॅपिंगचा आरोप केल्यानंतर या प्रकरणाची (Phone Tapping Case) चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. राज्य सरकारने पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यी समिती स्थापन केली आहे. ही समिती फोन टॅपिंग प्रकरणी (Phone Tapping Case) चौकशी करुन 3 महिन्यात आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

राज्यात भाजपची (BJP) सत्ता असताना माझ्यासह इतर अनेकांचे फोन टॅप करण्यात आले होते, असा आरोप नाना पटोले यांनी केला होता. तसेच याप्रकरणी संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी देखील नाना पटोले यांनी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात केली होती. त्यानंतर राज्य सरकारने (State Government) पटोले यांच्या आरोपांची गंभीर दखल घेत चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 3 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.

गृहमंत्र्यांनी दिलं होतं आश्वासन

पावसाळी अधिवेशन मध्ये नाना पटोले यांनी माझ्यासह इतर अनेकांचे फोन टॅप केल्याचा आरोप केला होता. यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे फोन टॅप होत असल्याचे सभागृहात सांगितले होते. ही बाब अतिशय गंभीर आहे. कोणत्याही व्यक्तीचा फोन टॅप करण्यासाठी विशिष्ठ कायद्यानुसार गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांची परवानगी घ्यावी लागते. फोन नंबर द्यावे लागतात. मात्र, दुसऱ्याच व्यक्तीचे नाव घेऊन नाना पटोले यांचा फोन टॅप करण्यात आला होता. आता या प्रकरणाची चौकशी होणार आहे.

Web Title : Phone Tapping Case | phone tapping probe after patoles allegations establishment of 3 member committee by the government

 

TCS Recruitment | कामाची गोष्ट ! जगातील सर्वात मोठी IT कंपनी देतीय 40 हजार लोकांना नोकरी; इन्फोसिसला सुद्धा पाहिजेत यावर्षी 26 हजार फ्रेशर्स

IAS Officer Transfer | राज्यातील 7 सनदी (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या; ‘PMPML’ च्या अध्यक्षपदी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची नियुक्ती