वेदांता-फॉक्सकॉननंतर आता PhonePe देखील महाराष्ट्र सोडणार

पोलीसनामा ऑनलाईन : PhonePe | वेदांता फॉक्सकॉन (Vedanta-Foxconn) हा प्रकल्प गुजरातमध्ये (Gujrat) गेल्यामुळे सध्या महाराष्ट्राचे राजकारण पेटले आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच आता PhonePe या कंपनीने महाराष्ट्राबाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीने आपले मुंबईतील कार्यालय कर्नाटकमध्ये (Karnataka) स्थलांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. फोन पे (PhonePe) च्या या निर्णयामुळे राज्यात पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी वेदांता-फॉक्सकॉनने आपला प्रोजेक्ट गुजरातमध्ये सुरू करण्याची घोषणा केली होती. याअगोदर हा प्रोजेक्ट महाराष्ट्रात (Maharashtra) येणार होता. या प्रोजेक्टमुळे दीड लाखांपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार होत्या. मात्र कंपनीने यानंतर गुजरातमध्ये हा प्रोजेक्ट होणार असल्याची घोषणा केली.

फोन पे ने आपल्या जाहिरातीत काय म्हटले?

“कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयल महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राज्यात बदलण्यासाठी कंपनी कायदा 2012 च्या कलम 13 अंतर्गत केंद्र सरकारकडे (Central Government) अर्ज करण्यात आला आहे.
यासंदर्भात कंपनी मेमोरँडम ऑफ असोसिएशनमध्ये (Memorandum of Association) फेरफार करण्यासंदर्भात
16 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत हा ठराव मंजूर करण्यात आला असल्याचे कंपनीने आपल्या नोटिसीमध्ये म्हटले आहे.

Web Title :- PhonePe | after vedanta foxcoon now phonepe will leave maharashtra move office to neighboring state

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Accident News | धक्कादायक! ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून 6 महिन्यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Hardeep Singh Puri | चंद्रपुरात पेट्रोलियम रिफायनरी स्थापन करणार; केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांची घोषणा