‘PhonePe’ नं लॉन्च केली ATM सुविधा, आता दुकानदाराकडून घेऊ शकणार ‘कॅश’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डिजिटल पेमेंट प्लॅटफार्म फोन पेने एक यूनिक फीचर फोन पे एटीएम लॉन्च केले आहे. हे फीचर त्या यूजर्सला मदत करेल ज्यांना कॅशची आवश्यकता आहे. ग्राहकांना अनेकदा आसपासच्या क्षेत्रात बँक एटीएम नसल्याने अडचणी येतात तर काही ठिकाणी एटीएम खराब असते. अशा वेळी ग्राहकांना कॅशची आवश्यकता असल्यास ग्राहक फोन पे अ‍ॅपवर स्टोर टॅबवर जवळील दुकानात उपलब्ध असलेल्या फोन पे एटीएमची माहिती मिळवू शकतात.

यासाठी ग्राहकांना फक्त फोन पे अ‍ॅप सुरु करावे लागेल. त्यानंतर स्टोअर्स पर्यायावर जावं लागेल आणि फोन पे एटीएम ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. यानंतर यूजरला आसपासच्या मर्चेंटचा पर्याय दिसेल. सध्या नियमानुसार कोणीही व्यक्ती एका दिवसात 1 हजार रुपयांपर्यंत कॅश काढू शकतात. सध्या हा प्रोजेक्ट प्रायोगिक तत्वावर सुरु आहे, हे फीचर सध्या दिल्ली एनसीआरमध्ये लॉन्च करण्यात आले आहे.

यानंतर तुम्ही दुकानात जाऊन ‘Withdraw’ बटनवर क्लिक करुन आवश्यक रक्कम काढू शकतात. जितके पैसे तुम्ही दुकानदाराला ट्रांसफर कराल तेवढे पैसे ते तुम्हाला कॅश देतील. फोन पे च्या ऑफलाइन बिजनेस डेवलपमेंटचे हेड विवेक लोचहेब यांनी सांगितले की यामुळे ना की फक्त ग्राहकांना कॅश मिळण्यास मदत होईल तर दुकानदाराला देखील सतत बँकमध्ये जाण्याची आवश्यकता भासरणार नाही.

यासाठी ग्राहकांना किंवा दुकानदाराला कोणतेही जास्तीचे शुल्क द्यावे लागणार नाही. सध्या बँकने एटीएम कॅश काढण्याची एक महिन्याची संख्या मर्यादित केली आहे. यानंतर अनेकदा कॅश काढल्याने जास्त शुल्क द्यावे लागते. तसेच जे एटीएम कार्ड जे बँकद्वारे इश्यू केले जातात त्याचे देखील 100 ते 150 रुपये शुल्क बँकांकडून घेतले जाते. यामुळे फोन पे कॅश एटीएम फायदेशीर ठरेल.

फेसबुक पेज लाईक करा –