PhonePe द्वारे मोबाइल रिचार्ज करणे पडणारा महागात, UPI पेमेंटवर सुरू केली प्रोसेसिंग शुल्क ‘वसूली’; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  वॉलमार्ट ग्रुपची (walmart group of companies) डिजिटल पेमेंट कंपनी फोनपे (PhonePe) च्या यूजर्सला मोबाइल रिचार्ज करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील. फोनपेने (PhonePe) युपीआयद्वारे (UPI) 50 रुपयांपेक्षा जास्त मोबाइल रिचार्जवर 1 ते 2 रुपयादरम्यान प्रोसेसिंग शुल्क वसूल करण्यास सुरूवात केली आहे. फोनपे असे पहिले डिजिटल पेमेंट अ‍ॅप (digital payment app) आहे, ज्याने युपीआय आधारित व्यवहारासाठी शुल्क वसूल करण्यास सुरूवात केली आहे. इतर प्रतिस्पर्धी कंपन्या ही सेवा मोफत देत आहेत.

 

इतर कंपन्यांप्रमाणे फोनपे (PhonePe) क्रेडिट कार्डच्या (credit card) माध्यमातून पेमेंट करण्यासाठी सुद्धा प्रोसेसिंग शुल्क घेत आहे.
फोनपेच्या प्रवक्त्याने सांगितले की, रिचार्जवर, आम्ही एका छोट्या स्तरावर चाचणी करत आहोत.
जिथे काही यूजर्स मोबाइल रिचार्जसाठी पेमेंट करत आहेत.
50 रुपयांपेक्षा कमी रिचार्जवर कोणतेही शुल्क नाही.

 

प्रवक्त्याने सांगितले की, 50 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंतच्या रिचार्जसाठी 1 रुपया आणि 100 रुपयांपेक्षा जास्त रिचार्जसाठी 2 रुपयाचे शुल्क घेतले जात आहेत.
चाचणीचा भाग म्हणून बहुतांश यूजर्स एकतर काहीच पेमेंट करत नाहीत किंवा केवळ एक रुपयाचे शुल्क देत आहेत.

थर्ड-पार्टी अ‍ॅप्समध्ये युपीआय ट्रांजक्शनच्या बाबतीत फोनपेकडे सर्वात जास्त भागीदारी आहे.
सप्टेंबरमध्ये कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मवर 165 कोटी युपीआय ट्रांजक्शन नोंदवले आहेत, जे अ‍ॅप सेगमेंटमध्ये जवळपास 40 टक्के आहे.

 

बिल पेमेंटवर स्पष्टीकरण देताना प्रवक्त्याने म्हटले, हे शुल्क वसूल करणारे आम्ही एकटे नाही.
बिल पेमेंटवर एक छोटे शुल्क वसूल करणे आता एक इंडस्ट्री मानक आहे आणि इतर बिलर वेबसाइट आणि पेमेंट प्लॅटफॉर्मसुद्धा ते करत आहेत.
आम्ही केवळ क्रेडिट कार्डद्वारे करण्यात येणार्‍या पेमेंटवर प्रोसेसिंग शुल्क वसूल करतो.

 

Web Title : PhonePe | phonepe starts charging processing fee on upi transactions for mobile recharges

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mumbai Cruise Drugs Case | ‘ही तुमची शूटिंग किंवा प्रोडक्शन हाऊस नाही’; चौकशीसाठी उशिरा आलेल्या अनन्या पांडेला समीर वानखेडेंनी सुनावलं

Life Certificate | पेन्शनधारकांनो, लवकर जमा करा ‘हयाती’चा दाखला, अन्यथा बंद होईल ‘पेन्शन’; जाणून घ्या शेवटची तारीख आणि प्रोसेस?

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलाजवळील ‘सेल्फी पॉईंट’ येथे भीषण अपघात; 3 ठार तर 12 जखमी, दोघे चिंताजनक (व्हिडिओ)