#BirthdaySpecial : टॉपलेस फोटोशूट ते ड्रग्ज तस्करी करणारी ‘हिरोईन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आज अभिनेत्री ममता कुलकर्णी हिचा आज वाढदिवस आहे. 20 एप्रिल 1972 रोजी ममता कुलकर्णीचा मुंबईत जन्म झाला आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त आपण तिच्याबद्दल काही रोचक गोष्टी जाणून घेणार आहोत. ममताच्या वादग्रस्त आयुष्यावर आपण एक नजर टाकणार आहोत. अनेकांना या गोष्टी माहीत नसतील. काही वादग्रस्त बाबींचा आपण आढाव घेऊयात.

ममताने 1992 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिरंगा या सिनेमातून तिने डेब्यू केला होता. परंतु ममता कुलकर्णीने केलेल्या एका आयटम साँगमुळे ती खरी प्रकाशझोतात आली. त्यानंतर तिने काही सिनेमात काम केलं. सबसे बडा खिलाडी, करन अर्जुन, आशिक आवारा आणि चायना गेट अशा सिनेमांमध्येही ती झळकली होती.

या सिनेमानंतर ममता खूपच चर्चेत येताना दिसून आली. ममताने टॉपलेस फोटोशुट केले. त्यानंतर ममताने ग्लॅमर इंडस्ट्रीत अक्षरश: धुमाकूल घातला. यानंतर काही महिला संघटनांनी यावर आक्षेप घेत ममताला विरोधही केला होता.

पण ‘चायना गेट’ या चित्रपटात ममता कुलकर्णीला जो रोल मिळाला त्यामागे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हात असल्याचं समोर आलं आणि ममताचे अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आले. ‘चायना गेट’ या सिनेमात ममताला रोल मिळवून देण्यात महत्वाची भूमिका पार पाडली ती अंमली पदार्थ तस्कर विकी गोस्वामी याने… यामुळे ममतेचे अंडरवर्ल्ड कनेक्शन किती घनिष्ठ आहेत, हे सिद्ध झाले.

ममता कुलकर्णी 2002 साली अचानक गायब झाली. त्यानंत ती एका वर्षाने ती दुबईला असल्याची माहिती समोर आली. ममता तिच्या बॉयफ्रेंडला सोडवण्यासाठी दुबईला गेल्याचे समोर आले. ममताचा बॉयफ्रेंड विकी गोस्वामी अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी दुबईच्या जेलमध्ये होता. त्याने ममतासाठी अक्षरश: अन्न पाणी सोडले होते. त्यानंतर ममताने ग्लॅमरला रामराम ठोकला. ममताने यानंतर गगनगिरी महाराजांच्या अध्यात्माची तिने दीक्षा घेतली. यानंतर बॉलिवूडमधील अभिनेत्री ग्लॅमरस ममता कुलकर्णी ‘योगिनी’ झाली. प्रियकर विकीच्या सुटकेसाठी ममताचा हा सगळा आटापिटा होता. 2012 मध्ये अखेर विकीची सुटका झाली. त्यानंतर ममता विकीसोबत केनियाला स्थायिक झाली होती.

यानंतर 2014 साली पुन्हा एक घटना समोर आली. अमेरिका आणि केनिया पोलिसांच्या अ‍ॅन्टी ड्रग युनिटने 2014 मध्ये कारवाई करत या प्रकरणी विकी गोस्वामी याला अटक करण्यात आली. विकीसोबत इतराही काहींना अटक झाली होती. त्यात केनियाचा ड्रग माफिया बराकत आकाश, बराकतचा छोटा भाऊ, पाकिस्तानचा ड्रग माफिया गुलाम हुसेन यांचा समावेश आहे. इतकेच नाही तर ममतालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.

ठाणे पोलिसांनी 2016 साली तब्बल 2 हजार कोटींच्या अंमली पदार्थ जप्ती प्रकरणी कारवाई केली होती. या कारवाईत विकी गोस्वामीचे नाव समोर आले होते. धक्कादायक म्हणजे ममता कुलकर्णीचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा दुजोरा ठाणे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिला.

एका बॉलिवूड अभिनेत्री ते योगिनी आणि योगिनी ते अंमली पदार्थांची तस्कर असा ममता कुलकर्णीचा वादग्रस्त प्रवास हा खरंच धक्कादायक आणि सर्वांनाच विचार करायला लावणारा होता. ममता कुलकर्णीचं आत्मचरित्र खूपच चर्चेत राहिलं आहे. ऑटोबायोग्राफी ऑफ योगिनी असं या आत्मचरित्राचं नाव आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like