Covid Precautions : आयुष मंत्रालयाने सांगितले कोरोनापासून बचावाचे सोपे उपाय, ‘हे’ अवलंबा आणि आजार ठेवा दूर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – लोकांना कोरोना व्हायरसपासून वाचवण्यासाठी आणि त्यांची इम्युनिटी मजबूत बनवण्यासाठी देशाच्या आयुष मंत्रालयाने काही उपाय सांगितले आहेत. आयुर्वेदिक पद्धतीवर आधारित हे उपाय पूर्णपणे नैसर्गिक असून त्यांचा कोणताही साईड इफेक्ट सुद्धा नाही.

अशी करा शरीर मजबूत करण्याची तयारी
सप्लिमेंट्सचे सेवन करण्याऐवजी तुम्ही नैसर्गिक पद्धतीने शरीराची इम्युनिटी मजबूत बनवू शकता. यासाठी रोज च्यवनप्राश खा, रोज दिवसात 1 किंवा 2 वेळा हळदीचे दूध प्या. सोबत तुळस, दालचीनी, काळीमिरी, आले आणि मनुका वापरून बनवलेला हर्बल चहा किंवा काढा सुद्धा दिवसात 1-2 वेळा आवश्य प्या. या आयुर्वेदिक उपयांनी शरीर मजबूत होईल.

1 रोज प्या गरम पाणी
थंड पाण्याऐवजी दिवसभरात गरम पाणी प्या. सोबतच गरम पाण्यात चिमुटभर मीठ आणि हळद टाकून गुळण्या सुद्धा करा.

2 घरचे ताजे अन्न खा
घरी बनवलेले ताजे जेवण खा आणि बाहेर ऑर्डर करणे टाळा. घरच्या जेवणात सुद्धा हळद, जिरे, लसून, आले आणि कोथेंबिरसारखे मसाले आवश्य वापरा.

3 योग करा
हेल्थ एक्सपर्ट सुद्धा सांगतात की, घरात असल्याने कोणतीही अ‍ॅक्टिव्हिटी होत नाही. यासाठी घरी योग, प्राणायाम, अनुलोम-विलोम, डीप ब्रिथिंग एक्सरसाईज करा.

हे उपाय सुद्धा परिणामकारक
* दिवसभरात एक-दोन वेळा वाफ घ्या. या पाण्यात पुदीना किंवा ओवा टाकू शकता.
* खोकला असल्यास लवंग किंवा ज्येष्ठमध पावडर मधासोबत दिवसात दोन तीन वेळा घ्या. समस्या वाढली तर डॉक्टरांकडे जा.
* ऑईल पुलिंग सुद्धा लाभदायक. यात 1 चमचा तिळाचे किंवा खोबरेल तेल तोंडात घ्या. 2-3 मिनिटांपर्यंत तोंडात तेल फिरवा आणि नंतर थूंकून टाका. नंतर गरम पाण्याने गुळण्या करा.

(नोट : कोणताही उपाय करण्यापूर्वी नेहमी एखादा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. पोलीसनामा या माहितीसाठी जबाबदारीचा दावा करत नाही.)