दोन गर्भाशय, 2 Vagina असलेली मुलगी, जी पीरियड्समध्ये सहन करते दुहेरी वेदना

विल्टशायर/लंडन :  वृत्तसंस्था –   एक मुलगी किंवा महिलेसाठी मासिक पाळी अतिशय वेदनादायक असते. कुणाची मासिक पाळी 2 ते 3 दिवसाच्या चक्रात होते तर कुणाला संपूर्ण आठवडाभर वेदना सहन कराव्या लागतात. कुणाला हेवी ब्लिडिंग होते, तर कुणाला लाइट. परंतु ब्रिटनमध्ये एक तरूण महिला अशी सुद्धा आहे, जिला दोन Vagina आहेत आणि यामुळे तिला अन्य महिलांच्या तुलनेत दुहेरी वेदनांचा सामना करावा लागतो. इतकेच नव्हे, या महिलेला दोन गर्भाशय आहेत, ज्यामुळे तिला प्रेग्नंसीमध्ये समस्या येत आहेत.

यूटेरस डायडेल्फिस (Uterus Didelphys) नावाचा दुर्मिळ आजार

या दुहेरी समस्याला तोंड देत असलेल्या तरूण महिलेचे नाव आंद्रिया आहे, जिला अशाप्रकारच्या समस्येला तोंड देत असलेल्या महिलांना मदत करायची आहे आणि सांगायचे आहे यामध्ये त्यांची काहीही चूक नाही. यासाठी स्वतामध्ये तुच्छतेची भावना येऊ देऊ नये. आंद्रियाने जागृतता पसरवण्यासाठी या संपूर्ण प्रकरणात डेलीमेलशी चर्चा केली आणि आपली कथा सांगितली. तिने सांगितले की यूटेरस डायडेल्फिस नावाचा हा दुर्मिळ आजार आहे.

14 वर्षाच्या वयात पहिल्यांदा समजले

आंद्रियाने सांगितले की, ती 14 वर्षांची होती, तेव्हा तिला समजले की, तिच्या शरीरात ’Double Vagina’ आहे आणि पोटात दोन-दोन गर्भाशय आहेत. आंद्रियासाठी अशा स्थितीत कुणाशी बोलणेही अवघड होऊन बसले होते. परंतु, जेव्हा वेदना जास्त वाढल्या, तेव्हा तिने डॉक्टरांची मदत घेतली. डॉक्टरांनी तपासणीसाठी जेव्हा स्पेकुलम तिच्या नाजुक अवयवाच्या आत टाकण्यास सुरूवात केली तेव्हा तो केवळ 2 इंचावर थांबला. कारण, येथून तिची अंतर्गत सिस्टम दोन भागात विभागली होती. आणि तेव्हा त्यांनी आंद्रियाला पहिल्यांदा सांगितले की, ती इतर मुलींपेक्षा वेगळी आहे.

यावेळी कुणाला सांगितले नाही

आंद्रियाला डॉक्टरांनी जेव्हा पहिल्यांदा सांगितले की, तिची दोन्ही Uterus पूर्णपणे ठिक आहेत, तेव्हा तिला आणखीच चिंता झाली. कारण अशा स्थितीत एक अंग कमजोर असते, जे काम करत नाही. परंतु आंद्रियाच्या प्रकरणात दोन्ही Uterus आणि दोन्ही गर्भाशय सामान्य होती. मात्र, डॉक्टरांनी तिला याच्या गांभीर्याबाबत काहीच सांगितले नाही, यासाठी आंद्रियाने सुद्धा कुणालाही काही सांगितले नाही.

मुलाचा थांबला होता विकास

आंद्रियाला सर्वात जास्त समस्या तेव्हा झाली, जेव्हा ती 17 वर्षांची झाली. आंद्रियाने सांगितले की जेव्हा ती 17 वर्षाच्या वयात पहिल्यांदा प्रेग्नंट राहिली, तेव्हा तीन महिन्यानंतर तिच्या गर्भातील बाळाचा विकास थांबला होता. कारण तिच्या शरीराची अंतर्गत रचनाच अशी होती की, मुलाला वाढण्यासाठी जागाच मिळत नव्हती. यामुळे ती आई बनू शकली नाही.

तिने आपल्या स्थितीबाबत आपला पार्टनर ओलिवरशी चर्चा केली. आंद्रियाने सांगितले की, तिच्या पतीने साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला सुद्धा आशा आहे की, ती सामान्य पद्धतीने आई होऊ शकते. आंद्रिया म्हणते, अजून सुद्धा अनेक प्रश्न असे आहेत, ज्यांची उत्तरे मला हवी आहेत. तिने म्हटले की, अशा स्थितीत मी दोन्ही गर्भाशयात गर्भधारणा करू शकते. परंतु, जागा कमी असल्याने त्यांच्या जीवाला धोका असेल. परंतु, एक मार्ग हा सुद्धा आहे की, मी गर्भधारणा करेन आणि नंतर मुलांना शरीराच्या बाहेर विकसित केले जाईल. सध्या असे तंत्रज्ञान आले आहे. मात्र, आंद्रिया म्हणते की माझ्या शरीरामुळे मला माझे खासगी क्षण जगण्यात कोणतीही समस्या जाणवली नाही.