‘एली अवराम’नं केला हॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस ‘एंजेलिना जोली’चा लुक, ‘अतरंगी’ फोटोशुट ‘व्हायरल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार एली अवराम (Elli AvRam) आपल्या लुक आणि हॉटनेससाठी फेमस आहे. एक हॉट आणि बोल्ड अ‍ॅक्ट्रेस म्हणून एली ओळखली जाते. अलीकडेच एली मलंग सिनेमात दिसली. या सिनेमातील तिच्या लुकचं चाहत्यांनी खूपच कौतुक केलं. कुठे ना कुठे तिचा लुक हॉलिवूड सिनेमा टॉम्ब रेडर मधील अभिनेत्री एंजेलिना जोलीनं साकारलेल्या लारा क्रॉफ्टसोबत मेळ खाताना दिसला. ब्लॅक वेस्ट पँट आणि शुज अशा एलीच्या लुकनं चाहत्यांना टॉम्ब रेडर सिनेमाची आठवण करून दिली. अली अवरामचं नवीन फोटोशुट शध्या सोशलवर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

एलीनं ब्लॅक आउटफिट केला आहे. या फोटो एली खपच बिंधास्त दिसत आहे. काही फोटोत ती सिगारेटचे कश मारताना पोज देत आहे. एलीच्या चाहत्यांनाही तिचा हा बिंधास्तपणाचं कौतुक केलं आहे. चाहत्यांना तिचा हा लुक खूप आवडला आहे.

एलीच्या खासगी आयुष्याबद्दल बोलयाचं झालं तर एली आपल्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटर हार्दिक पंड्यासोबच्या अफेअरमुळेही ती चर्चेत राहिली आहे. हार्दिकच्या कौंटुबिक कार्यक्रमात एली नेहमीच हजर असायची. परंतु दोघांनी नंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला. याशिवाय तिचं नाव बॉलिवूड स्टार सलमान खान आणि मनीष पॉलसोबतही जोडलं गेलं आहे.

एलीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2013 आलेल्या मिकी वायरस या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. याशिवाय एली किस किस से प्यार करूं, नाम शबाना, बाजार, जबाडिया जोडी यांसारख्या अनेक सिनेमात दिसली आहे. एलीनं सिनेमा आणि अल्बमच्याआधी अनेक जाहिरातीतही काम केलं आहे. बॉलिवूड स्टार अक्षय कुमारसोबत तिनं पहिली अ‍ॅड केली आहे. एली बिग बॉसमध्येही दिसली आहे. नुकतीच ती मलंग सिनेमात दिसली. 7 फेब्रुवारी रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता.