फुफ्फुसांना ‘निरोगी’ ठेवण्याचे अचूक उपाय, नियमीत करा ‘या’ 6 गोष्टींचा वापर, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – फुफ्फुसे आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि त्यांना निरोगी ठेवणे आपल्या शरीरासाठी महत्वाचे आहे. आपली फुफ्फुस केवळ हवाच नाही, तर प्रदूषण आणि धूम्रपानाची धोकादायक हवा देखील घेतात. हे प्रदूषण दमा, ब्रोकायटिस, सिस्टिक फायब्रोसिस आणि इतर लोकांमध्ये न्यूमोनियासारख्या श्वसन आरोग्याच्या समस्येचा धोका वाढवतात. फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी अनेक उपाय आहेत, जसे नियमित व्यायाम करणे आणि निरोगी अन्न खाणे. लसूण, आल्याचे सेवन करणे. आज आपण अशा काही उपायांबद्दल जाणून घेणार आहोत, जे तुमच्या फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यास मदत करतील.

व्हिटॅमिन सी समृद्ध आहार
व्हिटॅमिन सी आपल्या फुफ्फुसासाठी सर्वात गुणकारी आणि फायदेशीर असते. लिंबूवर्गीय फळांमध्ये- संत्री, लिंबू, टोमॅटो, किवी, स्ट्रॉबेरी, द्राक्षे, अननस, आंबे इत्यादींमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते. शरीरातील विषारी पदार्थ दूर करण्यात व्हिटॅमिन सी सर्वात फायदेशीर आहे.

लसूण
लसूणमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आपली फुफ्फुसं साफ करण्यास मदत करतात. तसेच लसणाच्या वापरामुळे कफची समस्याही दूर होण्यास मदत होते.

मनुके
मनुके आपल्या फुफ्फुसांना बळकट करण्यासाठी उपयुक्त आहेत आणि दररोज भिजलेले मनुके खाणे फायदेशीर असते.

तुळशीची पाने
तुळस देखील एक अतिशय प्रभावी अँटिऑक्सिडेंट आहे आणि ती छातीत गोठलेला कफ काढून टाकण्यास मदत करते. काही तुळशीची पाने चहामध्ये घालून सेवन करावे.

मुलेठी
मुलेठीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात आणि हे आपले फुफ्फुस साफ करण्यास मदत करते.

आलं
आलं शरीरात डिटॉक्सिफाय करण्यात सर्वात फायदेशीर मानले जाते आणि दररोज सकाळी आल्याचा रस गरम पाण्यात मधासह घेतल्यास आपली फुफ्फुस डिटॉक्स होतात.