प्रेग्नंसी’दरम्यान पतीसोबत ‘रोमँस’ करताना दिसली अभिनेत्री शिखा सिंह ! फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम : अ‍ॅक्ट्रेस शिखा सिंह हिनं कुमकुम भाग्य या मालिकेत काम करून घरा-घरात आपली ओळख निर्माण केली आहे. शिखा सिंह सध्या तिचा प्रेग्नंसी पीरिडय एन्जॉय करताना दिसत आहे. तिनं अनेकदा तिच्या बेबी बंपचे फोटो शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वीच तिनं पतीसोबत काही रोमँटीक फोटोही शेअर केले होते ज्यात ती बेबी बंपदेखील फ्लाँट करताना दिसत होती. शिखाचे हे फोटो खूपच सुंदर होते. हेच फोटो सध्या सोशलवर चर्चेत आले आहेत.

स्पोर्टी लुकमध्ये शिखा
शिखाच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर अनेक फोटोत शिखा स्पोर्टी लुकमध्ये दिसत आहे. यात तिचं बेबी बंप स्पष्ट दिसत आहे.

पतीसोबत रोमँटीक झाली शिखा
प्रेग्नंसीदरम्यान शिखा पतीसोबत रोमँस करतानाही काही फोटोत दिसत आहे. शिखाचे हे रोमँस करतानाचे फोटो सोशलवर व्हायरल होत आहेत. इथंही शिखा तिचं क्युट बेबी बंप फ्लाँट करत आहे.

शेअर केले पतीसोबत किसिंग फोटो
शिखानं पतीसोबत असेही काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती पतीला किस करत आहे. त्यांच्या रोमँटीक पोज पाहण्यासारख्या आहेत.