मी अत्यंत रुढवादी पाश्वभूमीमधून, पाडल्या ‘त्या’ भिंती : मिस इंडिया सुमन राव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘मिस इंडिया २०१९’ चा ताज पटकवणारी सुमन रावचे म्हणणे आहे की, तिचा विजय खूप महत्वाचा आहे आणि हे सगळ्यांसाठी आशेचा किरण आहे. राजस्थानमध्ये उदयपुरजवळ एक गावात जन्म घेणारी सुमन जेव्हा एक वर्षाची होती तेव्हा तिचा परिवार मुंबईमध्ये स्थायिक झाला. रावने सांगितले की, ‘एफबीबी कलर्स फेमिना मिस इंडिया वर्ल्ड’ चा किताब मिळवणे हा माझ्यासाठी खूप भावूक क्षण होता कारण ताजला मिळविण्यासाठी मी समाजातील परंपरेलेला तोडले आहे.

https://www.instagram.com/p/BnGPhitFz4V/

सुमनने सांगितले की, ‘मी अत्यंत रुढवादी पाश्वभूमीमधून आहे. आमच्या समाजात मॉडेलिंग करणे खूप मोठी गोष्ट आहे. आमच्यामध्ये मी पहिली मुलगी आहे जिने हा किताब पटकावला आहे. मला माहित नाही की ये काय असते ? मी एक वर्षाआधी तयारीला सुरुवात केली होती.’

राजस्थानच्या राव समुदायमध्ये मॉडेलिंग दुनियेत पाऊल टाकणारी ही पहिली महिला आहे. त्यामुळे त्यांच्या परिवारासाठी हे खूप मोठी गोष्ट आहे.

सुमन म्हणाली की, ‘जेव्हा मी टॉप तीनमध्ये सामिल झाले तेव्हाच माझ्यामध्ये बदल होण्यास सुरुवात झाली. आता पुर्ण समाजाला माझ्यावर गर्व आहे. जे लोक माझ्यामध्ये बदलावाची वाट पाहत होते ते खूप खुश आहे. ते म्हणतात की, तु खूप चांगले काम करत आहे. मिय इंडियाचा प्रवास स्कुल सारखा होता. खूप काही शिकायला मिळाले.

पुढे ती म्हणाली, ‘माझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रु येत होते पण मी रडले नाही कारण तो क्षण मला कॅमेरामध्ये कैद करायचा होता.’

https://www.instagram.com/p/ByAdvkKJsvY/

सुमन राव सामाजिक जीवनामध्ये खूप सक्रिय आहे. तिने ‘चाइल्ड फाऊंडेशन’ नामक संस्थेसाठी आतापर्यंत ८० हजार रुपये जमा केले आहे. सुमन मिस इंडिया बनण्याच्या आधी बास्केट बॉलचे अनेक मॅचेस खेळली आहे.
https://www.instagram.com/p/BxdarwfJW37/

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस