Homeमहत्वाच्या बातम्याSBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर ! 'ही' कार घेतली तर घरातच इंस्टॉल होणार...

SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर ! ‘ही’ कार घेतली तर घरातच इंस्टॉल होणार ‘फ्री चार्जर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही टाटा कंपनीची इलेक्ट्रीक कार खरेदी करणार असाल तर तुमच्या घरी फ्री चार्जर इंस्टॉल करण्यात येणार आहे. ऑटोलोनसाठी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी SBIनं ग्राहकांना ही ऑफर दिली आहे.

Tata Nexon Ev

जर तुम्ही Tata Nexon Ev ही कार विकत घेत असाल तर तुम्हाला घरी फ्री चार्जर इंस्टॉल करून दिला जाणार आहे. एसबीआयनं ट्विटरवरून अशी माहिती दिली आहे.

घरात असेल चार्जिंग सुविधा

जर तुम्ही ही कार खरेदी केली तर घरात तुम्हाला बॅटरी चार्च करता येणार आहे. यासाठी तुम्हाला चार्जिंग स्टेशनवर जाण्याची गरज पडणार नाही.

7.50 टक्के व्याज दरात वाहन कर्ज उपलब्ध

जर तुम्हाला यासाठी कर्ज हवं असेल फक्त 7.50 टक्के दराने वाहन कर्ज दिलं जाणार आहे. कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही SBIYONO च्या माध्यमातून अर्ज भरू शकणार आहात.

कसा कराल अर्ज ?

Tata Nexon Ev या कारची बुकिंग करणयासाठी तुम्हाला YONO अॅपवर LogIn करावं लागेल. ऑटोमोबाईल पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर टाटा मोटर्सवर क्लिक करून
Tata Nexon Ev ची निवड करा.

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News