PUBG Mobile चे APK डाउनलोड करणे बेकायदेशीर नाही, जाणून घ्या कसे करावे डाउनलोड

पोलीसनामा ऑनलाईन : भारतात PUBG वर भलेही बंदी आहे. परंतु केंद्र सरकारने स्पष्ट केले की, PUBG Mobile Kr कोरियन व्हर्जन आहे, जे सुरक्षित आहे आणि त्याची एपीके फाइल डाउनलोड करणे बेकायदेशीर नाही. अलीकडेच, पीयूबीजी मोबाइलचे नवीन 1.2 अपडेट देखील रिलीज झाले आहे. PUBG Mobile India नावाने भारतात रिलॉन्च करण्याची तयारी करत आहे.

पीयूबीजी मोबाइल इंडिया रिलाँच भारतात पीयूबीजी मोबाइल इंडियाच्या नावाने तयार केले जात आहे. कंपनीने आपल्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटर पेजवरून ही घोषणा केली आहे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून याबाबत कोणतेही अपडेट नाही. या दरम्यान, एका अहवालानुसार पीयूबीजी मोबाइल इंडियाच्या कोरियन वर्जनची नवीन आवृत्ती 1.2 आली आहे. आपण त्याचा APK दुवा सहज डाउनलोड करू शकता.

-आधी https://www.tap.io/mobile वर क्लिक करा
– आता येथे PUBG Mobile Koria शोधा
– फाईल डाउनलोड करा
– डाउनलोड केल्यानंतर ओपन बटण दाबा

दरम्यान, सेटिंग्ज बदलल्याशिवाय आपल्या मोबाइलमध्ये एपीके फाइल डाउनलोड करणे सोपे नाही. प्रथम सेटिंग्ज वर जा. येथे सुरक्षितता आणि गोपनीयता वर टॅप करा. आता येथे आपल्याला Allow Installation from Unknown Sources ला सिलेक्ट करावे लागेल.