जिया खानची बहिणच नव्हे तर आतापर्यंत ‘या’ 7 अ‍ॅक्ट्रेस अन् मॉडेलनं साजिद खानवर केलेत गंभीर आरोप ! वाचून बसेल ‘धक्का’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  डायरेक्टर साजिद खान (Sajid Khan) वर आतापर्यंत अनेक मॉडेल आणि अ‍ॅक्ट्रेसनं लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. अद्याप 7 अ‍ॅक्ट्रेसनं त्याच्यावर सेक्शुअल मिसकंडक्ट केल्याचा आरोप केला आहे. दिवंगत अ‍ॅक्ट्रेस जिया खान (Jiah Khan) ची बहिण करिश्मा खान ( Karishma Khan) हिनं नुकतेच साजिदबद्दल धक्कादायक आणि चकित करणारे खुलासे केले आहेत. साजिदनं स्क्रिप्ट वाचतानाच जियाला टॉप आणि ब्रा काढायला सांगितलं होतं असं ती म्हणाली आहे. यानंतर आता शर्लिन चोपडा हिनंही हा मुद्दा उचलून धरला आहे.

1) जिया खान – जिया खानच्या मृत्यूवर आधारीत एका मीडियाची डॉक्युमेंट्री डेथ इन बॉलिवूडमध्ये जियाची बहिण करिश्मानं सांगितलं की, रिहर्सल दरम्यान जिया तिची स्क्रिप्ट वाचत होती. तेव्हा साजिदनं तिला टॉप आणि ब्रा काढायला सांगितलं.

2) मॉडल पॉला – मॉडल पॉलानंही तिचा अनुभव सागितला होता. तिनं सांगितलं होतं की, जेव्हा ती 17 वर्षांची होती तेव्हा साजिदनं तिच्या सोबत गैरवर्तन केलं होतं. पॉलानं सांगितलं की, साजिदनं तिला त्याच्या समोर कपडे काढायला सांगितलं होतं.

3) शर्लिन चोपडा (Sherlyn Chopra) – जियाचं प्रकरण समोर आल्यानंतर आता शर्लिन चोपडा हिनं साजिदवर गंभीर आरोप केले. तिनं सांगितलं की, 2005 मध्ये साजिदनं तिच्या समोर प्रायव्हेट पार्ट काढला आणि तिला फील करायला सांगितलं होतं.

4) सलोनी चोपडा (Saloni Chopra) – अ‍ॅक्ट्रेस सलोनी चोपडा हिनंही साजिदवर आरोप केले आहेत. सलोनीनं सांगतिलं की, साजिदनं तिच्यासोबतही गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता

5) रेचल व्हाईट (Rachel White) – अ‍ॅक्ट्रेस रेचल व्हाईट हिनंही साजिद खानवर गंभीर आरोप केले होते. रेचलनं सांगितलं की, तो माझ्यासोबत अश्लील भाषेत बोलू लागला. म्हणाला की, सिनेमात रोल करण्यासाठी तुला कपडे काढावे लागतील. रेचलनं ट्विटरवरून या घटनेची माहिती दिली होती.

6) करिश्मा उपाध्याय (Karishma Upadhyay) – मीटू चळवळी दरम्यान करिश्मा उपाध्याय नावाच्या एका पत्रकारानं देखील साजिद खानच्या अशा हरकतींबद्दल सांगितलं होतं. करिश्मानं ट्विट करत लिहिलं होतं की, जेव्हा ती साजिद खानचा इंटरव्ह्यु घेण्यासाठी गेली तेव्हा तो त्याचं पेनिस बाहेर काढू लागला होता.

7) अहाना कुमरा – द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, लिपस्टिक अंडर माय बुर्का आणि अनेक वेब सीरिजमध्ये काम करणारी अ‍ॅक्ट्रेस अहाना कुमरा हिनंही साजिदवर चकित करणारे आरोप केले होते. तिनं सांगितलं होतं की, साजिदनं तिला अनेक विचित्र प्रश्न विचारले होते. साजिदनं तिला विचारलं की, जर तुला 100 कोटी रुपये मिळाले तर तू कुत्र्या सोबत सेक्स करशील का असं तिनं सांगितलं होतं.