Photos : सारा अली खाननं दाखवला मल्टीकलर ड्रेसमधील ‘हॉट’ अवतार !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस सारा अली खान (Sara Ali Khan) कायमच आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळं सोशल मीडियावर अटेंशन घेताना दिसत असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आजवर सोशलवर व्हायरल झाले आहेत. कधी ती हॉट लुकमध्येही दिसली आहे. सारानं तिचा बोल्ड बिकिनी अवतारही अनेकदा दाखवला आहे. आता पुन्हा एकदा सारा आपल्या लुकमुळं चर्चेत आली आहे.

सारानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. या ती खूपच सुंदर आणि ग्लॅमरस अवतारात दिसत आहे. आपल्या लुकला तिनं बोल्डनेसचा तडकाही दिला आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं मल्टीकलर ड्रेस घातला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार सारा सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिच हे फोटो मालदीवमधीलच आहेत. फोटोत तिच्या बॅकग्राऊंडला समुद्रही दिसत आहे.

साराचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. तिच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. अनेक चाहते कमेंट करत तिचं कौतुक करत आहेत.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती लव आज कल 2 मध्ये दिसली होती. यानंतर ती कुली नंबर वन या सिनेमात दिसली आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन प्रमुख भूमिकेत होता. हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. याशिवाय लवकरच सारा अतरंगी रे या सिनेमातही काम करताना दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुष असणार आहे. आनंद एल राय हा सिनेमा डायरेक्ट करणार आहेत.