शाहरुख खानची ऑनस्क्रीन मुलगी सना सईद आता नाही राहिली ‘पापा की परी’, बनली सुपर ग्लॅमरस

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   शाहरुख खानच्या ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटात इतर पात्रांप्रमाणे अंजली नावाच्या मुलीचे पात्र देखील मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते. ही भूमिका सना सईदने साकारली होती. ती गोंडस मुलगी आता 32 वर्षांची आहे. चाईल्ड आर्टिस्ट सना आता मोठी झाली आहे आणि चित्रपटांपासून दूरदर्शनवरील कार्यक्रमांमध्ये आपला जलवा दाखवत आहे. सना सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह असते आणि ती तिची ग्लॅमरस फोटो देखील पोस्ट करत राहते. नुकताच करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ दी इयर’ चित्रपटातही तिचा ग्लॅमरस अभिनय पाहायला मिळाला. या चित्रपटात ती आपल्या हॉट चिक लुकसह चाहत्यांची मने जिंकण्यात देखील यशस्वी ठरली.

चाईल्ड आर्टिस्ट म्हणून सना सईदने ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटांशिवाय ‘बादल’ आणि ‘हर दिल जो प्यार करेगा’ चित्रपटांत मध्ये देखील भूमिका केली. तसेच सना चित्रपटांमध्ये आयटम नंबर करताना देखील दिसली आहे. सना चित्रपटांपेक्षा दूरदर्शन मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत दिसली. तिने ‘बाबुल का आंगन छुटे न’, ‘लो हो गई पूजा इस घर की’, ‘कॉमेडी सर्कस’ आणि ‘लाल इश्क’ मध्ये काम केले आहे. तसेच सना ‘झलक दिखला जा’, ‘नच बलिये 7’, ‘झलक दिखला जा 9’ आणि ‘स्प्लिट्स व्हिला’ या रिअ‍ॅलिटी शोमध्येही दिसली आहे.

दरम्यान, सना सईद सिद्धार्थ शुक्लाशी मैत्री करण्याविषयी देखील चर्चेत आली होती. ‘झलक दिखला जा’ च्या सेटवर दोघांची मैत्री झाली होती. या शो दरम्यान शाहरुख खानने मजेत सिद्धार्थला त्याच्या ऑन स्क्रीन मुलगीसाठी अप्रूव्हल देखील दिला होता, परंतु या दोघांनी नेहमी स्पष्ट सांगितले की, ते फक्त चांगले मित्र आहेत.