Apple ला टक्कर देत आहे ही Fitness Tracker Watches, जबरदस्त आहेत फिचर्स

नवी दिल्ली : मागील काही वर्षापासून लोक आपल्या फिटनेसबाबत खुपच गंभीर झाले आहेत. अशावेळी मॉर्निंग वॉकपासून इव्हनिंग वॉकच्या दरम्यान स्टेप्स मोजणे आणि कॅलरी कमी केल्याचे आकडे लोकांना व्यायाम करण्यासाठी उत्साहित करत आहेत. या कारणासाठी फिटनेस ट्रॅकर वॉच आणि स्मार्ट वॉचची डिमांडसुद्धा मार्केटमध्ये वाढली आहे. जर तुम्हाला सुद्धा फिटनेस ट्रॅकर वॉच खरेदी करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सध्या मार्केटमध्ये कोणती चांगली वॉच उपलब्ध आहेत, ज्यांचे फिचर्स आणि लुक याबाबत माहिती जाणून घेवूयात.

फिटबिट चार्ज 4
यामध्ये बिल्ट-इन जीपीएससारखी फिचर्स आहेत. स्लीप-ट्रॅकिंग हार्डवेयर आणि सॉफ्टवेयर दिले आहे. स्मार्ट अपग्रेडसुद्धा दिले आहे, जसे की झोन मिनिट्स मेट्रिक जे हाय-इन्टेन्सिटी एक्सरसाइज आणि हॉबी आणि गोल्फ गेम्ससाठी आऊटडोर वर्कआऊट श्रेणीचा शोध घेण्यासाठी आहे.

फिटबिट व्हर्सा लाइट एडिशन
स्वस्त किंमतीत स्मार्टवॉच/फिटनेस ट्रॅकर कॉम्बो हवे असणार्‍यांसाठी हा चांगला पर्याय आहे. हे वर्सा लाइट एडिशन अँड्रॉइड आणि आयफोन दोन्हीसोबत काम करते. हे वॉच 4 दिवसांचा बॅटरी बॅकअप देते. हे झोपताना घातल्यास योग्य झोपेची-ट्रॅकिंग सुविधेचा लाभ घेऊ शकता. मात्र, हे फक्त जीपीएसशी जोडलेले आहे. अल्टीमीटर यात नाही. स्विमिंग लॅपला सुद्धा ट्रॅक करत नाही.

Letsfit फिटनेस ट्रॅकर
लेट्सफिट स्मार्टवॉच वाटर प्रूफ आहे, ज्याचे पेडोमीटर अचूक रिझल्ट देते. वॉचची बॅटरी आठवड्याचा बॅकअप देते. याचा बँड एकदम नरम आणि आरामदायक आहे.

Apple वॉच सीरीज 6
जर तुमच्याकडे आयफोन असेल तर हा सर्वात चांगला फिटनेस ट्रॅकर आहे. अ‍ॅक्टिव्हिटी-क्लोजिंग रिंग्स आणि इलेक्ट्रोकार्डियोग्रामशिवाय, ब्लड ऑक्सीजन सेन्सर, नवा बँड आणि केस कलरसह हे उपलब्ध आहे. यात ब्लड मॉनिटरिंग तंत्रज्ञान नाही. यात एकच प्रोसेसर आणि अ‍ॅप्पल वॉच सीरीज 5 सारख्या अनेक वैशिष्ट्ये आहेत.

Oura रिंग
याचे सेन्सर अतिशय संवेदनशील आहेत. याचे एल्गोरिदम स्मार्ट आहे. महिलांसाठी यात खास फिचर आहे, जे पिरियडच्या अगोदरच शरीरात तापमानाच्या घसरणीची नोंद घेते. हे महिला आरोग्य अ‍ॅपने अपग्रेड आहे.

वीथिंग्स मूव्ह ईसीजी
या स्मार्टवॉचमध्ये अनालॉग फेस असतात. याचे मूव्ह ईसीजी सर्वश्रेष्ठ आहे. हे वॉच तुमच्या प्रत्येक अ‍ॅक्टिव्हिटी आणि झोपेला ऑटोमेटिक ट्रॅक करते.

गार्मिन फेनिक्स 6 एस प्रो
हे सर्वात चांगले आऊटडोर मल्टीस्पोर्ट वॉच आहे. यात सोलर चार्जिंग नाही. मात्र, सॅटेलाइट नेव्हिगेशन सिस्टम, अनेक गेम मोड, चांगला बॅटरी बॅकअप, इमर्जन्सी अलर्ट, अ‍ॅक्सीडेंट डिटेक्शन सिस्टम आहे. हे छोटे आणि आरामदायक आहे. मोठा रंगीत सनलाईट व्हिज्युअल डिस्पले आणि टेलीग्राफिक मॅपची सुविधा सुद्धा आहे.

गार्मिन फॉरेनर 645 म्यूजिक
फॉरेनर 645मधील म्यूझिक अनेकांना पसंत आहे. यात 500 गाणी स्टोअर करता येतात. हे छोटे, हलके आणि वॉटर प्रूफ आहे. यात सनलाईट व्हिज्युअल डिस्प्लेसह पाच बटन आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी वॉच अ‍ॅक्टिव्ह
सॅमसंग गॅलेक्सी एस20 एक हलके, आकर्षक बेस्ट फिटनेस ट्रॅकर वॉच आहे. हे वॉटर आणि डस्ट प्रूफ आहे. यात इनबिल्ट जीपीएस, हर्ट रेट मॉनिटर सारख्या सुविधा सुद्धा आहेत. याच्या पॉवर शेयर फिचरने हे चार्ज करण्यासाठी तुम्ही सॅमसंग फोनचा वापर करू शकता.

Suunto Suunto 7
हे ओएस वॉच रोजच्या वापरासाठी सोपे आहे. जे यापूर्वी आलेल्या अन्य सून्टो वॉचच्या तुलनेत खुप सोपे आहे.