अ‍ॅक्ट्रेस अमीषा पटेलचा ‘बोल्ड’ अवतार, 44 व्या वर्षीदेखील हॉटनेसचा ‘कहर’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस अमीषा पटेल हिनं नुकताच (मंगळवार दि 9 जून 2020) आपला 44 वा वाढदिवस साजरा केला आहे. या दिवशी तिनं काही चांगलं करण्याचा निर्णय घेतला आणि वाढदिवसाच्या निमित्तानं गरीब महिलांना सॅनिटरी नॅपकिन, मास्क आणि बिस्कीट यांचं वाटपही केलं. अमीषाचा जन्म 9 जून 1976 रोजी झाला होता. अद्यापही तिनं लग्न केलेलं नाही. अमीषा आजवर अनेकदा तिच्या बोल्ड अवतारामुळं चर्चेत आली आहे. काही वेळेस ती ट्रोलही झाली आहे.

अमीषानं अलीकडेच तिच्या इंस्टारून काही बोल्ड फोटो शेअर केले होते. फोटोत ती खूपच हॉट अवतारात दिसत होती. तिनं फोटो शेअर करताच लगेचच ते व्हायरल होतान दिसले. परंतु ज्याप्रमाणे काहींना तिचा बोल्डनेस आवडला, तसाच काहींना तो खटकताना दिसला. अनेकांनी तिला या बोल्ड फोटोंसाठी ट्रोल केलं होतं.

अमीषाच्या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या होत्या. कोणी तिला वयाचं भान ठेव असंही म्हटलं होतं. काही लोक म्हणाले की, तिनं असे बोल्ड फोटो शेअर नाही केले पाहिजे. याआधीही तिनं काही बोल्ड बिकिनी फोटो शेअर केले होते. तेव्हाती ती ट्रोल झाली होती. एकानं तिला बेरोजगार असंही संबोधलं होतं.

अमीषाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर धमाकेदार पद्धतीनं आपल्या करिअरला सुरुवात करणारी अमीषा आता सिनेमात दिसत नाही. अनेक इव्हेंटमध्ये ती दिसत असते. अनेक फॅशन शोज आणि फॅशन ब्रँडला ती कनेक्टेड आहे. तिनं सिनेमात कमबॅक करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ती फ्लॉप झाली. 2000 साली आलेल्या कहो ना प्यार है या सिनेमातून तिनं हृतिक रोशनसोबत डेब्यू केला होता.