Corona आणि ब्लॅक फंगसनंतर मुलांमध्ये MIS-C चा धोका, याबाबत जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेश कोरोनाशी सामना करत असतानाच ब्लॅक, व्हाईट आणि यलो फंगसचा कहर वाढत चालला आहे. याच दरम्यान आणखी एक आजार पाय पसरत आहे. यापेक्षाही भीतीदायक बाब ही आहे की, हा छोट्या मुलांना होत आहे. या आजाराबाबत जाणून घेवूयात…

कोविडमधून  बरे घाल्यानंतर मुलांमध्ये ‘मल्टी-सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम’ (एमआयएस-सी) ने चिंता वाढवली आहे. या सिंड्रोममध्ये मुलांचे अनेक अवयव प्रभावित होत आहेत. कोविड-19 (coronavirus)ने संक्रमित झाल्यानंतर काही आठवड्यानंतर हा आजार मुलांना होत आहे. कोरोनाच्या coronavirus दुसर्‍या लाटेत दोन मुलांमध्ये हा आजार दिसून आला आहे. आतापर्यंत 5 मुलांमध्ये हा आजार समोर आला आहे.

कोरोना coronavirus महामारीतून बरी झालेली मुले ‘मल्टी- सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम’ संक्रमित होण्याचा धोका असू शकतो. फोर्टिस हेल्थकेयरमध्ये बालरोग तज्ज्ञ डॉ. योगेश कुमार गुप्ता यांचे म्हणणे आहे की, मी म्हणू शकत नाही की हा धोकादाय आहे. परंतु निश्चितपणे अनेकदा संक्रमित मुलांना वाईटप्रकारे प्रभावित करतो. हा मुलांचे हृदय, लिव्हर आणि किडनीला वाईट प्रकारे प्रभावित करू शकतो.

बालरोग तज्ज्ञ डॉ. योगेश सांगतात की, हा संसर्ग कोरोना झाल्यानंतर चार ते सहा आठवड्यानंतर होतो. गुप्ता म्हणाले की, एमआयएस-सी कोविड-19 शी सामना करण्यासाठी शरीरात तयार झालेले एंटीजनच्या प्रतिक्रियेचा हा परिणाम आहे. कोविड-19 चा संसर्गाची अनेक प्रकरणे हलकी किंवा किरकोळ लक्षणांची असतात. परंतु एकदा संसर्गातून मुक्त झाल्यानंतर मुलांच्या शरीरात अँटीबॉडी निर्माण होते, हिच अँटीबॉडी मुलांच्या शरीरात प्रतिक्रिया करते. तिच त्यांच्या शरीरात अ‍ॅलर्जी सुद्धा निर्माण करू शकते.

डॉ. गुप्ता म्हणाले, अन्य देशात कोविड-19 पीकवर असताना एमआयएस-सी चे डॉक्युमेंटेशन केले आहे. मगाच्या वर्षी अशी तीन प्रकरणे आली होती आणि दुसर्‍या लाटेनंतर दोन प्रकरणे आली आहेत. त्यांनी शंका व्यक्त केली की, एमआयएस-सी ची प्रकरणे आणखी वाढू शकतात.

तज्ज्ञांनुसार, मुलांमध्ये मल्टी-सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम रेयर आहे. तज्ज्ञ मानतरत की, हा एक छोटा पर्सेंटेज आहे, परंतु याचा सखोल तपास करण्याची आवश्यकता आहे. पुढील लाटेच्या पूर्वी याच्याबाबत स्पष्ट माहिती असणे खुप आवश्यक आहे.

Also Read This : 

‘पिंपरी- चिंचवडमध्ये अजित पवारांनी विकासकामे करुनही नशिबी पराभवच आला’ – राज ठाकरे

DIG मनु महाराज यांचे ‘फेक’ फेसबूक प्रोफाइल बनवून मुलींशी अश्लील चॅटिंग, झाली अटक

फुफ्फुसांना ‘निरोगी’ ठेवायचंय तर ‘ही’ 5 योगासने करा, कोरोनापासून होईल बचाव, जाणून घ्या

विलायचीचं अधिक सेवन पडू शकतं महागात, ‘या’ आजारांचे होऊ शकता शिकार, जाणून घ्या

Maharashtra : राजघराण्यातील सदस्याला पैशांसाठी केलं ब्लॅकमेल, एक लाखाची खंडणी घेताना काँग्रेसचा नेता अटकेत