शिवसेनेच्या मंत्र्यांच्या दालनात आमदार आदित्य ठाकरेंचा ‘फोटो’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या कार्यालयात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे फोटो लावले जातात. बाळासाहेबांचे नातू आणि उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आमदार आदित्य ठाकरे यांचे देखील आता फोटो लावले जात आहेत. मात्र, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत अनेक बैठकिंना उपस्थित राहतात. त्यामुळे त्यांचे पक्षातील स्थान आणखीनच उंचावले आहे.

उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या दालनात आदित्य ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे देसाई यांच्या दालनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो आहे. तर दुसऱ्या भिंतीवर आदित्य ठाकरे यांचा फोटो आहे. त्यामुळे शिवसेना मंत्र्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच आमदार आदित्य ठाकरे हे पूज्य आहेत का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी परळीकरांना येत्या पाच वर्षात मतदारसंघात पंचतारांकित एमआयडीसी उभारून उद्योगाला चालना देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच उद्योगाला चालना मिळाल्याने रोजगार निर्मिर्ती होईल असेही आश्वासन मुंडे यांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या दालनात चर्चा केली. या बैठकिचा फोटो त्यांनी ट्विट केला आहे. या फोटेत सुभाष देसाई यांच्या दालनात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो दिसत आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/