आ. मेधा कुलकर्णींच्या हँडबिलावरती काँग्रेस चिटणीसाचे छायाचित्र

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पानशेत पूरग्रस्तांना मालकीची घरे देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार येत्या ३० तारखेला पुण्यात होणार आहे. भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी हा कार्यकम आयोजित केला आहे. भाजपच्या आमदाराने आपल्या पक्षाच्या मंत्रीमहोदयांचा सत्कार करणे साहजिक आहे. पण या कार्यक्रमासाठी हँडबिल वाटले जात आहे त्यावर पुणे शहर काँग्रेसचे चिटणीस मंगेश खराटे यांचा फोटो ठळकपणे छापला आहे शिवाय संयोजक म्हणूनही खराटे यांचा उल्लेख केला आहे . यामुळे कोथरुड विधानसभा मतदारसंघातील भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहांच्या जीवाला धोका ?

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ea40569d-c2ee-11e8-ad40-e93a03d4389a’]

पानशेत पूरग्रस्तांच्या मालकीच्या घरांच्या प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. खराटे यांनी वीस वर्ष पाठपुरावा केला. आघाडी सरकारच्या काळात काही प्रमाणात या प्रकरणाला चालना मिळाली पण यश मर्यादितच होते. आमदार कुलकर्णी यांनी हा विषय हाती घेतला आणि खराटे यांच्या लढ्याला पाठिंबा दिला. फडणवीस सरकारने निर्णायक पध्दतीने प्रश्न सोडविला. महसूलमंत्री पाटील यांनी यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. या विषयाचे श्रेय घेण्यासाठी मेधाताई यांनी पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवला असला तरी त्यांनी खराटे यांनाही श्रेयाचा वाटा दिला आहे. अन्य पक्षातील लढावू कार्यकर्त्याची दखल राजकारणात क्वचितच घेतली जाते. यानिमित्ताने मेधाताईंनी नवा पायंडा पाडला असे म्हणता येईल. मात्र खराटे भाजपच्या वाटेवर आहेत का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ea40569d-c2ee-11e8-ad40-e93a03d4389a’]

खराटे हे काँग्रेसचे नेते चंद्रकांत शिवरकर यांच्या गटाचे मानले जातात. एरंडवणा प्रभाग क्र.१३ मध्ये काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने खराटे यांनी अपक्ष म्हणून पुणे महापालिकेची निवडणूक २०१७मध्ये लढविली होती.