उंदरांचा दरोडा… फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
एटीएम मशीन फोडून दरोडा घातल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील पण आता एका  एटीएम मशिन  मध्ये चक्क उंदरांनी दरोडा घातला आहे. एका एटीएम मशीन मधलया जवळपास २०  ते २५ लाख रुपयांच्या नोटा कुरतडल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर भलतेच व्हायरल होत आहेत. मात्र हे फोटो नक्की कुठले आहेत हे स्पष्ट झालेले नाही. पण जिथे कुठे या मूषकराजांचा दरोडा पडला आहे. त्या बँकेचे मात्र नुकसान झाले आहे.

सोशल नेटवर्किंग वर व्हायरल होत असलेल्या काही पोस्ट्समध्ये हे फोटो वसई येथील अंबाडी रोडवरील HDFC बँकेच्या एटीएम मधील असल्याचे सांगण्यात येत आहे तर काही पोस्ट मध्ये नालासोपाऱ्यातील एटीएममध्ये ब्लास्ट झाल्याने पैशाचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत संबंधित स्थनिक पोलीस ठाणे आणि बँक यांच्याकडे विचारणा केली असता, या व्हायरल  झालेल्या मेसेजेसला कुठलाही दुजोरा मिळत नाही पण हि पोस्ट सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनत आहे.

सोशलवर भरोसा हाय काय … 

एखादी पोस्ट सोशल मीडियावर इतकी व्हयरल होते कि, ती खरी आहे का खोटी याची खातरजमा केल्याशिवाय ती  पुढे पाठवली  जाते.  त्यामुळे काही लोकांना जळगाव मध्ये मारहाण देखील झाली होती. इतकेच काय अभिनेत्री शबाना आझमी यांना देखील या व्हायरल मेसेजेस चा फटका बसला आहे. एका हॉटेल मध्ये घाण पाण्यात भांडी धुतानाचा व्हीडिओ त्यांनी भारतीय रेल्वेचा आहे समजून. भारतीय रेल्वेला ट्विट केले होते. नंतर हा प्रकार इथला नसल्याचे उघड झाल्यामुळे त्यानी भारतीय रेलवीची माफी मागितली होती.व्हायरल होणारे मेसेजेस ची पडताळणी करूनच ते पुढे पाठवायला हवेत. आता व्हॉट्सअपवर व्हायरल झालेली घटना खरीच घडली आहे का? घडली असेल तर कुठे घडली आहे? इतक्या मोठ्या प्रमाणात नोटा कोणी कुरतडल्या? हे फोटो खरेच आहेत की मॉर्फ केलेत? असे प्रश्न अनुत्तरीत आहेत.