लोणावळ्याजवळील ‘या’ ठिकाणी एकदा नक्की जा, ‘तन-मन’ फ्रेश होण्याची ‘गॅरंटी’, जाणून घ्या सविस्तर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यापासून 50 किमी अंतरावर तर लोणावळ्यापासून 20 किमी दूर कॅम्प प्रो लेक कॅम्पिंग पवना आहे. याच्याजवळच तिकोना, लोहगड, वीसापूर आणि तुंग फोर्ट आहेत. इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी, फोटोग्राफीसाठी तसेच फिरण्यासाठी उत्तम जागा आहे. पवनामध्ये तुम्हाला थंड हवा, खुलं आकाश वाहतं पाणी असं मोहक, निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळतं. डोंगरांनी वेढलेल्या भागात तुम्ही हिरव्यागार मैदानात टेंटमध्ये राहण्याचा आनंद घेऊ शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही 7499358329, 8806002217 या नंबरवर संपर्क साधू शकता. लोणावळ्यात असल्याने येथे पुणे आणि मुंबईतून येणाऱ्या लोकांची गर्दी जास्त असते.

Pawana

या ठिकाणी जाताना तुम्हाला काही प्रवास बोटीतून करावा लागतो. किनाऱ्यालगतच तुम्हाला टेंट लावलेले दिसतात. तिथेच राहण्याची सोय असते. या ठिकाणी सायंकाळी चहा पकोड्यांची सोय असते. आपल्या जवळच्यांसोबत तुम्ही क्रिकेट, चेस, कॅरम तसेच आर्चरी अशा खेळांचाही आनंद घेऊ शकता. इतकेच नाही तर आपल्या जवळच्या खास व्यक्ती सोबत तुम्ही तलावाच्या किनारी असलेल्या हॅमॉकवर क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता. गुलाबी थंडीत तुम्हाला व्हेज – नॉनव्हेज बार्बेक्युचा आनंद घेऊ शकता. तेही अनलिमिटेड. रात्री तुम्ही कॅम्पफायरचा आनंदही घेऊ शकता. ,सकाळचा नजारा डोळ्याचं पारणं फेडेल असा आहे. येथील व्यवस्थापक आकाश मोहोळ आणि त्यांच्या कुटुंबाकडून तुम्हाला आपलेपणाची भावना मिळेल.

Pawana

या गोष्टींचा घेऊ शकता आनंद –
बोटींग
गेम्स
डिजे म्युझिक
बार्बेक्यु
गेम्स
कॅम्पफायर
शेजारील दर्शनीय स्थळं
टेंट स्टे
लेक स्विमिंग

Pawana

सेफ डिजे नाईट –
सायंकाळी 7 वाजल्यापासून रात्री उशीरापर्यंत म्युझिक नाईटचा आनंद घेता येतो. यावेळी तुम्ही फ्रेंड्स किंवा फॅमिली तसेच पार्टनरसोबत तिथे डान्स करू शकता. ही जागा खूप सुरक्षित आहे. इथे स्वच्छ टॉयलेट आणि बाथरूमची सुविधाही देण्यात आली आहे.

Pawana

तिकीट –
एका दिवसाच्या कॅम्पसाठी तुम्हाला 999 रुपये द्यावे लागतात. तुम्ही ऑनलाईन तिकीटही बुक करू शकता. campprolakecamping.com ही अधिकृत वेबासाईट आहे. याशिवाय तुम्ही गोआयबिबो, मेक माय ट्रीप, बुक माय शो आदींच्या मदतीनेही तिकीट बुकिंग करू शकता. तुम्ही 7499358329, 8806002217 या नंबरवरही संपर्क साधू शकता. कॅम्प प्रो लेक कॅम्पिंग पवनाचे प्रमुख आकाश मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Pawana

कॅप्सच्या स्थळी कसे जाल ?
कॅम्प प्रो कॅम्पिंग शॉर्ट विकेंडसाठी उत्तम पर्याय आहे. गुगलवर याचं अ‍ॅक्युरेट लोकेशन देण्यात आलं आहे. तुम्ही बाईक, कार किंवा बसनेही जाऊ शकता.

नॅशनल हायवे 48 पुणे हा पवना कॅम्पकडे जातो. तुम्ही कार भाड्यानं घेऊ शकता.
मुंबईतून तुम्ही कामशेत रेल्वे स्टेशनला जाऊ शकता. इथून तुम्हाला पुढे जाण्यासाठी टॅक्सी मिळेल. इथून पवना कॅम्प 17 ते 20 किमी दूर आहे. तुम्ही तुमच्या बाईकनेही जाऊ शकता.

Pawana

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/