ढिंच्याक पूजाचे ‘हे’ फोटो सोशलवर व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – असा शोधूनही क्वचित एखादाच सापडेल जो ढिंच्याक पूजाला ओळखत नसेल. एके काळी युट्युबवरील गाण्यांमुळे ढिंच्याक पूजा खूप चर्चेत आली होती. आता यानंतर खूप दिवसांनी ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी मात्र ती चर्चेत येण्याचे वेगळे कारण आहे. आता यावेळी व्हिडीओंमुळे नाही तर फोटोंमुळे ती चर्चेत आली आहे. तसेही या ना त्या कारणाने ती नेहमी चर्चेत येत असते.

ढिंच्याक पूजाची फॅनफॉलोविंगही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर काहीही केले की ती चर्चेत असते.

नुकताच तिने फेसबुकवरील आपलं प्रोफाईल पिक्चर बदललं आहे. या फोटोंमध्ये ती मॉडेलपेक्षा कमी नाही दिसत. ढिंच्याक पूजाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना भलतेच आवडले आहेत. काहींनी या फोटोंवर नकारात्मक कमेंट्सही केल्या आहेत. यामुळे पूजा ट्रोल होतानाही दिसत आहे.

पूजाच्या फोटोवर मुकेश कुमार नावाच्या एका युजरने म्हटले आहे की, “पूजा तू तोपर्यंत गात रहा, जोपर्यंत मादाम तुसाँममध्ये तुझा पुतळा तयार केला जात नाही.” इमरान कुरेशी नावाच युजर म्हणतो की, “मी तुझा डाय हार्ड फॅन आहे पूजा नौंटकी.”

आता सोशल मीडियावर लोकांनी काहीही कमेंट्स केल्या तरी तिच्या लोकप्रियतेबाबत मात्र काही शंकाच नाही.

जेव्हा पूजा बिग बॉस मध्ये आली होती तेव्हा तिथे असा कोणीच सेलिब्रिटी नव्हता ज्याला पूजाबद्दल माहिती नाही. पूजाची लोकप्रियताही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे हे ही तितकेच खरे आहे.

https://www.instagram.com/p/BsTJHTJFMSo/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/BrRsGtXFn8m/?utm_source=ig_embed