‘पॉर्न’ फिल्म शूट करण्यासाठी त्यानं 11 तरुणींना बोलावलं, केलं जे नको करायला हवं ‘ते’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका फोटोग्राफरने महिलांना पॉर्न फिल्म शूट करण्याच्या बाहण्याने आपल्या स्टूडिओमध्ये बोलावले आणि त्यानंतर त्यांच्यावर बलात्कार केला. 41 वर्षीय ब्रिटिश फोटोग्राफर पॉल ब्राउनला 11 महिलांचे लैंगिक शोषण आणि इतर आरोपांतर्गत दोषी ठरवण्यात आले.

ब्रिटनचे एक्स्टर क्राऊन न्यायालायने पॉलला या बलात्काराच्या प्रकरणात दोषी ठरवले, कारण या प्रकरणात महिलांची सेक्शुअल एक्टिव्हीटीसाठी संमती नव्हती. तपासात हे समोर आले की पॉल पॉर्न फिल्म शूट करण्याचा बहाणा करत होता आणि फेक पॉर्न स्टूडिओ चालवत होता.

पॉलला 6 महिलांचे लैंगिक शोषण करण्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. त्याने महिलांना सांगितले होते की तो एडल्ट शूटिंगमधून कोट्यावधी कमावतो. पॉल ब्रिटनच्या डेवनमध्ये एक फोटोग्राफी स्टुडिओ चालवत होता. महिलांना संपर्क करण्यासाठी तो वेगवेगळ्या नावांचा वापर करत होता. सोशल मीडियावर 18 ते 66 वर्षीय महिलांशी संपर्क करत होता.

फेक बिजनेस चालवण्यासाठी त्याने खोटी कंपनी मॉडल साऊथ वेस्ट बनवली होती. महिलांना संपर्क साधून तो महिलांना सांगत असे की तुमच्यामध्ये मॉडेलिंगची क्षमता आहे. त्यानंतर महिलांना आपल्या जाळ्यात अडकवत असे. पॉलला फेब्रुवारी 2020 मध्ये शिक्षा सुनावण्यात येईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/