फोटोशुटसाठी गावात बोलावल्यानंतर फोटोग्राफरकडून ‘मॉडल’वर बलात्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील एका फोटोग्राफरने फोटोशुटच्या बहाण्याने एका महिला मॉडेलला गावात बोलविले. त्यानंतर लग्न करण्याच्या वचन देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. याबाबत पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुग्रामचे पोलीस प्रवक्ते सुभष बोकन यांनी घटनेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, महिलेच्या तक्रारीवरुन पोलीस ठाण्यात झिरो एफआयआर दाखल केली आहे. त्यानंतर ती संबंधित जिल्ह्यात ट्रान्सफर करण्यात आली.

पिडीत महिला सहा महिन्यांपुर्वी गोविंद नावाच्या फोटोग्राफरच्या संपर्कात आली होती. त्यानंतर त्याने महिलेशी ओळख वाढवून फोटोशुटचे आमिष दाखवत तिला शामली जिल्ह्यातील त्याच्या गावी बोलविले. महिला गावात राहत असताना त्याने तिच्याशी शारिरीक संबंधही ठेवले होते. दरम्यान त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. मात्र तिने लग्नासाठी विचारताच त्याने लग्नाला नकार दिला. तसेच त्याने महिलेचे इन्टिमेट फोटो सोशल मिडीयावर शेअर करण्याची धमकीही दिली. जेव्हा महिलेने तक्रार करण्याची धमकी दिली. तेव्हा आरोपीने सोशल मिडीयावर आक्षेपार्ह संदेश पोस्ट केला. ज्यामुळे ती घाबरली त्यानंतर तिने एफआयआर करण्याचा निर्णय घेतला.

आरोग्यविषयक वृत्त –