शुजात बुखारी यांच्या मारेकऱ्यांची छायाचित्रे जाहीर

श्रीनगर: वृत्तसंस्था

‘रायझिंग काश्मीर’ या दैनिकाचे संपादक शुजात बुखारी यांची हत्या करण्यात आली होती. आता शुजात यांच्या मारेकऱ्यांचे फोटो जम्मू – काश्मीर पोलिसांना मिळाले आहेत. पोलिसांनी हे फोटो जाहीर केले आहेत. एका सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजवरून घेतलेली ही छयाचित्रे पोलिसांनी जाहीर केले आहेत.

काय आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये…

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन बाईकस्वार दिसत आहेत त्यांनी आपला चेहरा झाकला आहे. शुजात बुखारीयांच्या हत्येचा वेळी ही घटना प्रत्यक्ष पाहणारे नागरिक तेथे उपस्थित होते. त्यामुळे या संशयित हल्लेखोरांबद्दल माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. लाल चौकजवळील ‘रायझिंग काश्मीर’ या दैनिकाच्या कार्यालयाजवळ संपादक शुजात बुखारी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यात बुखारी व अन्य दोघेजण ठार झाले होते.

You might also like