PHOTOS : ‘रमजान’मध्ये बदलला खा. नुसरत जहाँचा ‘अंदाज’ !

पोलिसनामा ऑनलाइन –नुकतीच रमजानच्या पवित्र महिन्याला सुरुवात झाली आहे. अशात आता टीएमसी खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ यांनीही आता पारंपरिक वेशभुषा केली आहे. त्यांनी पारंपरिक लुक करत चाहत्यांना आणि फॉलोवर्सना रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नुसरत जहाँ नेहमीच आपल्या लुक आणि फोटोंमुळं चर्चेत येत असतात अलीकडेच त्यांनी इफ्तारीचे काही फोटो शेअर केले आहेत. जे सध्या सोशलवर अटेंशन घेताना दिसत आहेत.

नुसरत यांच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर चाहत्यांसोबत शेअर केलेल्या फोटोत दिसत आहे की, त्यांनी पिवळ्या रंगाचा सलवार सूट घातला आहे. डोक्यवर ओढणीही घेतली आहे. फोटो शेअर करताना त्यांनी खास कॅप्शनही दिलं आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्या म्हणतात, “इफ्तारीच्या निमित्तानं.”

नुसरत यांचा हा लुकही चाहत्यांना नेहमीप्रमाणं आवडला आहे. अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याआधीही नुसरत यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात त्यांनी रमजान सुरु झाल्याबद्दल चाहत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. नुसरत यांचा हा व्हिडीओ देखील सोशलवर प्रचंड व्हारल झाला होता. यावर व्हिडीओला देखील चाहत्यांना मोठा प्रतिसाद मिळाला होता.

https://www.instagram.com/p/B8Lc16Kn6zX/