पुलवामा दहशतवादी हल्ला : फोटो, चॅट हिस्ट्री आणि एका मोबाइल फोनद्वारे NIA नं सोडवला केसचा गुंता, जाणून घ्या कसं ते

नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा गुंता राष्ट्रीय तपास एजन्सी (एनआयए) ने सोडवल्याचा दावा केला आहे. मंगळवारी केसचे चार्जशीट दाखल करण्यात आले. तपासात मसूद अझहरचा पुतण्या मोहम्मद उमर फारूक, पाकिस्तानी दहशतवादी कामरान अली आणि कारी यासिरसारख्या दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले. 29 मार्च, 2019 ला हल्ल्यात सहभागी एक महत्वपूर्ण दहशतवादी फारूकचा मृत्यू झाला आहे, परंतु त्याचा मोबाईल फोन अनेक महिन्यांपर्यंत जम्मू-काश्मीर पोलिसांकडे पडून होता.

या मोबाईल फोनच्या रूपात डिसेंबर 2019 मध्ये एनआयएसाठी अशेचा पहिला किरण आला. फारुकच्या मोबाईल फोनमधून अनेक फोटो, व्हिडिओ आणि चर्चेचा रेकॉर्ड तपास एजन्सीजला सापडला. एका अधिकार्‍यानुसार मोबाईलमध्ये दहशतवाद्यांच्या पाकिस्तानातून भारतापर्यंतच्या प्रवासाची अनेक छायाचित्रे तसेच त्यांचा गट आणि बॉम्ब बनवण्याच्या प्रक्रियेची सुद्धा छायाचित्र होती.

याशिवाय तपासात जैश-ए-मोहम्मद नेतृत्वासोबत त्याचे व्हॉट्सअपवर बोलणे, विशेषकरून त्याचा काका अब्दुल रूफ असगर, पाकिस्तानमध्ये अम्मार अल्वी आणि खोर्‍यातून अन्य ऑपरेटिव्हसोबत चॅटचा तपशील मिळाला. इन्स्पेक्टर जनरल अनिल शुक्ला, डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल सोनिया नारंग आणि पोलीस अधीक्षक राकेश बलवाल यांच्या नेतृत्वात तपास पथकाला फारूकच्या फोनमध्ये एका काश्मीरी युवक शाकिर बशीर मगरेचे छायाचित्र मिळाले, त्याची ओळख पुलवामाच्या काकापोराचा रहिवाशी म्हणून पटवण्यात आली होती.

शाकिर बशीर मगरे, घटनास्थळाजवळ लाकडाची वखार चालवत होता, जेथून त्याने केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या ताफा पोहचल्याची माहिती घेतली होती. याप्रकरणात त्याला 28 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. त्याच्या घराचा वापर स्फोटकांचा स्टॉक करणे आणि बॉम्ब बनवण्यासाठी करण्यात आला होता. त्याच बॉम्बचा वापर सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्यासाठी करण्यात आला आणि 40 सुरक्षा कर्मचार्‍यांना मारण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप आहे.

चॅट रेकॉर्डमध्ये एनआयएला हे समजले की, हल्ल्यानंतर जेव्हा भारतीय आणि पाकिस्तानी फायटर जेटमध्ये डॉगफाइट सुरू होते तेव्हा फारुक ही चर्चा करत होता की, दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले पाहिजे कारण हे युद्ध शेकडो जैशच्या लोकांना भारतात घुसण्याची संधी देईल.

एनआयएने त्या चर्चा सुद्धा शोधून काढल्या, ज्या सिद्ध करत होत्या की, पाकिस्तानमध्ये बसलेल्या फारूकचा काका त्याला पुलवामानंतर दुसर्‍या हल्ल्याची तयारी करण्याचे निर्देश देत होता. परंतु, जैशला पाकिस्तानवर वाढत असलेल्या अंतरराष्ट्रीय दबावामुळे आपली योजना रद्द करावी लागली.

एजन्सीला पाकिस्तानच्या अलाइड बँक लिमिटेड आणि मीजान बँकमध्ये फारूकची दोन खाती सापडली, ज्यामध्ये पुलवामा हल्ल्यासाठी पैसे जमा करण्यात आले होते. फारूकच्या फोनमधून जप्त सेल्फी, फोटो, व्हिडिओ आणि चॅटने एनआयएला पाकिस्तानची दहशतवादी कारस्थान उघड करण्यास मदत झाली.