शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तमिळ इंडस्ट्रीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशीचा एक फोटो समोर आला आहे. फोटोत दिसत आहे की, दिगांगना जखमी झाली आहे. दिगांगनाने बॉलिवूडमध्ये ‘जलेबी’ आणि ‘फ्राई डे’सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. असे समजले आहे की, तमिळ चित्रपट ‘हिप्पी’ मध्ये बाईक सीनची शूटिंग करताना या अभिनेत्रीच्या पायाला दुचाकीचा सायलेंसर भाजले. हा एक स्टन सीन होता आणि तिथे अनेक सुरक्षा उपकरण उपस्थित होते तरी देखिल ही घटना घडली.

सेटवर दिगांगनाला बाइकवरुन राईट करताना कॅमेऱ्याच्या समोरुन जायचे होते. या शूट दरम्यान काही झाले नाही. पण बाइकवरुन उतरताना अभिनेत्रीच्या पायाला गाडीचे सायलेंसर भाजले. तिला लगेचच डॉक्टरकडे नेण्यात आले. सध्या डॉक्टरांनी तिला आराम करण्यास सांगितले आहे. दिगांगनाला भाजल्यामुळे शूटिंग थांबवावी लागली.

अभिनेत्री दिगांगना याबाबतीत म्हणाली की, ‘मी या गोष्टीमुळे खूप घाबरले होते. अशा परिस्थितीमध्ये मला माझ्या आईने मला हिम्मत दिली आणि प्रोत्साहन दिले. ‘

https://www.instagram.com/p/ByjiKPoF1jj/?utm_source=ig_embed

याआधी देखील दिगांगना सुर्यवंशीसोबत एक घटना घडली होती. ती घटना तिला खूपच महागात पडली होती. घटनी अशी होती की, दिगांगनाने एका अजगरासोबत फोटो काढण्यासाठी त्याला गळ्यात घातले. त्यानंतर तिने फोटोही काढले.

त्यानंतर त्या अजगराने तिचा गळा आवळायाला सुरुवात केली. हजरजबाबीपणा दाखवत दिगांगनाने वेळीच तो अजगर गळ्यातून बाहेर काढला. त्यामुळे अजगराचा डाव फसला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. तिने आजपर्यंत अनेक मालिकेत काम केले आहे. ‘वीरा’ या मालिकेतून तिला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली आहे.

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?

Loading...
You might also like