ईशा देओल दुसऱ्यांदा आई बनली

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – ईशा देओल दुसऱ्यांदा आई बनली आहे. तिने एका मुलीला जन्म दिला आहे. ईशा हेमा मालिनी आणि धर्मेंद्रची मोठी मुलगी आहे. ईशाने ही खुशखबर सोशल मीडियावर शेयर केली आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेयर करून मुलीचे नाव देखील सांगितले आहे. मुलीचा जन्म झाल्यानंतर पूर्ण परिवारामध्ये आनंदी वातावरण झाले आहे. बॉलीवूड रिपोर्टनुसार, ईशा देओलने आपल्या मुलीचे नाव मिराया तख्तानी ठेवले आहे.

ईशाने आपल्या पोस्टच्या मार्फत तिच्या चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांचे आभार मानले. तिने एक फोटो पोस्ट शेयर करत लिहिले की, सगळ्यांचे खूप – खूप धन्यवाद आणि आभार. ईशाने २०१७ मध्ये मोठ्या मुलीला जन्म दिला तिचे नाव राध्या तख्तानी ठेवले होते. ईशा देओल आणि भारत तख्तानीने २०१२ साली लग्न केले. ही आता त्यांची दुसरी मुलगी आहे. ईशाने आपल्या मोठ्या मुलीसोबत इंस्टाग्रामवर फोटो शेयर करत लिहिले की, ”मी लवकरच मोठी बहीण बनणार आहे.”

आरोग्यविषयक वृत्त –

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

झोपेत असताना कुणी छातीवर बसल्यासारखे वाटलेय का ?

अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा ‘