Photos : वृद्धांची सेवा करण्यासाठी मॉडेलिंग सोडणारी ‘हॅरिएट’ रिअल लाईफमध्ये दिसते एकदम ‘कडक’ !

पोलिसनामा ऑनलाइन –लंडनमधील एका प्रसिद्ध मॉडेलनं कोरोना व्हायरसच्या काळात वृद्धांची सेवा करण्यासाठी आपली मॉडेलिंग सोडली आहे. तिनं खुलासा केला आहे की, एक महिना आधीच तिनं केअर होममध्ये वृद्धांची सेवा करण्याचा निर्णय घेतला होता. इंस्टावरून या मॉडेलं एक पोस्टही शेअर केली होती ज्यानंतर या मॉडेलची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होऊ लागली. अनेकांनी तिच्या मॉडेलिंग असाईंमेंट पाहण्याची उत्सुकता होती.

वृद्धांसाठी आपली शानदार मॉडेलिंग सोडणाऱ्या मॉडेलचं नाव आहे हॅरिएट रोज जॉन (Harriet Rose John). हॅरिएट रोज जॉन (Harriet Rose John) ही लंडनमधील खूप फेमस मॉडेल आहे. हॅरिएटनं सांगितलं की, तिनं एक महिना आधीच होम केअर जॉईन केलं आहे. खास बात अशी की, देखभाल करण्यासाठी तिच्याकडे आलेल्या एकाही रुग्णाचा अद्याप मृत्यू झालेला नाही. यासाठी ती खूप लकी आणि हे तिच्यासाठी मोठं यश आहे असंही ती सागंते. तिनं सर्वांना सोशल डिस्टेंसिंग पाळण्यास आणि नियमित हात धुण्यास सांगितलं आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचही तिनं कौतुक केलं आहे. ज्या होम केअरमध्ये ती सेवा देत आहे, तिथलं नाव मात्र या मॉडेलनं काही सांगितलं नाही. तिनं इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली आहे जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

हॅरिएट रिअल लाईफमध्ये खूपच सुंदर आणि हॉट दिसते. ती अनेकदा आपल्या टॉपलेस आणि बिकिनी लुकमुळं चर्चेत आली आहे. तिच्या हॉटनेसनं अनेकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तुम्हीही तिचा हॉटनेस पाहिल्यानंतर तिचे फॅन व्हाल. हॅरिएट आपल्या आकर्षक फिगरसाठी खूप फेमस आहे.

https://www.instagram.com/p/B76nipQna7_/

हॅरिएटच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं डोल्से आणि गबाना साठी रॅम्पवर कॅटवॉक केलं आहे. डोल्से आणि गबाना इटलीतील फॅशन इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध नाव आहे. तिनं लंडनमधील अनेक टॉपच्या एजन्सीजसाठी करार केला आहे. तिनं अनेक मॅगेझिनच्या कव्हर पेजसाठी फोटोशुट केलं आहे.

https://www.instagram.com/p/Bv9zt6tHRk4/