बिहार आणि आसाममध्ये पुराचा हाहाकार !

पोलिसनामा ऑनलाईन – आसाम आणि बिहारमधील पूर परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. बिहारमध्ये कोरोनाचा कहर वाढतच चालला असतानाच दुसरीकडे पूराचा धोका वाढत आहे. राज्यात आतापर्यंत पूरामुळे जवळपास 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोक बेघर झाले आहेत. 11 जिल्ह्यांमधील जवळपास 15 लाख लोकांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशीच काहीशी परिस्थिती आसाममध्येही आहे. आसाममध्ये आतापर्यंत जवळपास 27 लाख लोक पूर परिस्थितीचा सामना करत आहेत. राज्यात पुरस्थिती उद्भवल्यापासून आतापर्यंत जवळपास 120 लोकांचा मृत्यू झाला आहे.

बिहारमध्ये पुरस्थितीमुळे 11 जिल्ह्यांमधील काही गावांमध्ये सोमवारी पाणी शिरल्यामुळे तेथील परिस्थिती आणखी बिघडली आहे. सरकारच्यावतीने एक बुलेटीन जारी करण्यात आले आहे. त्यामध्ये सांगण्यात आले आहे की, पुरामुळे 11 जिल्ह्यांमधील आणखी काही भागांत पुराचं पाणी शिरल्यामुळे 10 लाखांहून अधिक लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तब्बल 11 जिल्ह्यांमधील 93 गावांतील 765 पंचायतींमधील 24.42 लाख लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरभंगा जिल्ह्यात जवळपास 14 तालुक्यांमध्ये 8.87 लोख लोक पुरपरिस्थितीमुळे विस्थापित झाले आहेत.

सीतामढी, शिवहर, सुपौल, किशनगंज, दरभंगा, मुजफ्फरपूर, गोपालगंज, पश्चिम चंपारण, पूर्वी चंपारण, खगडिया आणि सारण या गावांवर पुराचा परिणाम झाला आहे. त्याशिवाय आसाममध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) 17 पथकं आणि एसडीआरएफची आठ पथके बचाव कार्य करत आहेत.