Photos :’अशी’ होती कंगना रणौतची हॉस्टेल लाईफ, पहा किती बदलली ‘क्वीन’ !

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार कंगना रणौतचनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत ज्यामुळं ती चर्चेत आली आहे. कंगनाचा हे थ्रोबॅक फोटो आहेत जे तिच्या टीमकडून शेअर करण्यात आले आहेत. कंगनाच्या हॉस्टेल लाईफचे हे फोटो आहेत. फोटोत कंगना आपल्या मैत्रिणींसोबत मस्ती करताना दिसत आहे.

कंगनाच्या टीमनं तिच्या इंस्टावरून नुकत्याच कंगनाच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत ज्यात ती खूप वेगळी दिसत आहे. कंगनाचा लुक पाहिला तर लक्षात येईल की, तिच्यात खूप बदल झाला आहे. कॅप्शनमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे, हे फोटो डीएव्ही 15 गर्ल्स स्कुल, चंदीगढमधील आहेत. हे फोटो तेव्हाचा आहेत जेव्हा स्कुल टाईमध्ये कंगना शाळेत मैत्रिणींसोबत मस्ती करत होती. या फोटोत कंगनाच्या त्या मैत्रिणींनाही टॅग करण्यात आलं आहे ज्यांच्यासोबत ती मस्ती करत आहे.

https://www.instagram.com/p/B_YLYxqh_T5/

कंनगानं जुने फोटो शेअर करून आठवणींना उजाळा दिला आहे. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. चाहत्यांनाही हे फोटो खूप आवडले आहेत.

https://www.instagram.com/p/B866a_ChQe9/

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पंगा सिनेमात दिसली होती. लवकरच ती आगामी सिनेमा थलायवी मध्ये दिसणार आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या बायोपिकमध्ये जयललिता यांची भूमिका कंगना साकारणार आहे. याशिवाय ती तेजस आणि धाकड या सिनेमातही काम करताना दिसणार आहे.

https://www.instagram.com/p/Bisqv67A6G3/

https://www.instagram.com/p/BisnBCvg60K/

https://www.instagram.com/p/Bf4ZQN8g4ZB/

https://www.instagram.com/p/Buo0RRjgUsK/

https://www.instagram.com/p/Bf4ZKcjgvn0/

https://www.instagram.com/p/BdV-q8zggUH/

https://www.instagram.com/p/Bcz3an4A76B/

https://www.instagram.com/p/Bcs6jM3gsz9/

https://www.instagram.com/p/BbAQef5AOrI/