समोर आले इरफान खानच्या अंत्ययात्रेचे फोटो !

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार इरफान खाननं आज (बुधवार दि. 29) जगाचा निरोप घेतला आहे. 53 वर्षीय अभिनेता दीर्घकाळापासून कॅन्सरसोबत लढा देत होता. कालच अचानक तब्येत बिघडल्यानं त्याला मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आयसीयुत त्याच्यावर उपचार सुरू होते. 2018 साली इरफान खानला आपल्या मेंदूत न्यूरोएंडोक्राईन ट्युमर असल्याचं समजलं होतं. यावर त्यावर त्यानं उपचारही घेतले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार मिळालेल्या माहितीनुसार, वैद्यकीय तपासणीनंतर इरफानचं पार्थिव रुग्णालयातून थेट वर्सोवाच्या कब्रीस्तानमध्ये नेण्यात आलं. इतं दुपारी 3 वाजता त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्याच्या अंत्ययात्रेचे काही फोटो समोर आले आहेत. त्याच्या अंत्य संस्कारांवेळी काही जवळचीच लोकं दिसून आली.

फोटोत दिसत आहे की, इरफानच्या अंत्य यात्रेत. काही कुटुंबीय आणि काही जवळचे लोक तसेच इतर काही नातेवाईक दिसत आहेत.

इरफान खान जाण्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे. डायरेक्टर शुजित सरकारनं इरफान खानच्या निधनाची बातमी कंफर्म केली होती. त्यांनी ट्विट करत सर्वांना माहिती दिली होती. ही बातमी वाचताच इंडस्ट्रीपासून तर अनेक नेत्यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं. पीएम मोदी, अमित शहा, राहुल गांधी यांच्यासह बिग बी पासून तर अक्षय कुमार पर्यंत अनेक स्टार्सनं सोशलवरून त्याला श्रद्धांजली वाहिली आणि दु:ख व्यक्त केलं आहे.

https://twitter.com/ShoojitSircar/status/1255377784773410818