भर पावसात अशाप्रकारे ‘लपाछपी’ खेळताना दिसून आल्या अभिनेत्री रेखा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रेखा नुकत्याच मुंबईमध्ये पावसामध्ये लपाछपी खेळताना दिसून आल्या. खरे हे आहे की, रेखा मुंबईच्या पावसापासून आपला बचाव करताना दिसून आल्या. अभिनेत्री रेखा या नुकत्याच मुंबईच्या बांद्रा येथे स्पॉट झाल्या. याच दरम्यान रेखा यांनी स्वतःला पांढऱ्या स्टोलने झाकले होते. रेखा त्यावेळी खूप गडबडीत होत्या आणि त्यांनी कॅमेऱ्याकडे एकदाही पाहिले नाही.

त्यांचे हे फोटो सोशल मिडियावर खूप तेजीने व्हायरल होत आहे. बॉलिवूडमधून मिळालेल्या माहितीनूसार, रेखा संध्याकाळी बांद्रामध्ये शॉपिंग करण्यासाठी निघाल्या होत्या. जेव्हा त्या घरी निघाल्या होत्या त्याच दरम्यान खूप पाऊस पडू लागला आणि त्यांनी पावसापासून आपला बचाव करण्यासाठी गाडीपर्यंत जाण्यासाठी छत्रीचा आधार घेतला आणि यासोबतच त्यांनी स्वतःला पांढऱ्या कपड्याने झाकले देखील होते.

याच दरम्यान त्यांना पाहून मिडिया देखील त्याचा पाठलाग केला. मिडियाने खूप बोलूनही रेखा यांनी आपला चेहरा दाखविला नाही. ही पहिली वेळ नाही की रेखा यांनी आपला चेहरा मिडियापासून लपविला आहे. याआधी देखील अनेकवेळा त्यांनी मिडियापासून स्वतःचा बचाव करताना दिसून आल्या आहे.

आरोग्यविषयक वृत्त –