..म्हणून सलमान खानची ‘ही’ Actress रुग्णालयात दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा दबंग सलमान खान सोबत लकी सिनेमात काम करणारी अभिनेत्री स्नेहा उल्लाल हिला रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. बॉलिवूड रिपोर्ट्सनुसार, स्नेहा उल्लाल हिला खूप तापामुळे रुग्णालयात दाखल केले आहे. याची माहिती स्नेहाने स्वत: आपल्या इंस्टा अकाऊंटवरून दिली आहे.

नुकतेच स्नेहाने तिचे 2 फोटो शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये स्नेहा म्हणते की, “माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. खूप जास्त ताप असल्याने माझ्यावर ट्रीटमेंट सुरु करत आहेत. त्यामुळेच मला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं आहे. हे खूपच भीतीदायक आहे परंतु मी लवकरच बरी होईन. मला जास्तीत जास्त आराम करायला सांगण्यात आले आहे. आता मला कंटाळा येत आहे. माझ्या माझी कालजी घेणारे अनेक लोकं आणि नेटफ्लिक्सही आहे. मी घरी जाण्यासाठी खूपच आतूर झाले आहे.”

तुम्हाला सांगू इच्छितो की, स्नेहा उल्लालचा चेहरा ऐश्वर्या रॉय बच्चन सोबत मिळता जुळत आहे. जेव्हा ती इंडस्ट्रीत आली होती तेव्हा तिच्याबाबत बोलताना अनेकांनी हेच म्हटलं होतं. असेही म्हटले जात होते की, केवळ ऐश्वर्यामुळेच स्नेहाला सलमानने सिनेजगतात आणलं आहे. लकी या सिनेमातून स्नेहाने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं. या सिनेमात ती सलमान खान सोबत झळकली होती. या सिनेमानंतर स्नेहा अनेक हिंदी तसेच तेलुगु सिनेमात दिसली होती.