PHOTOS : स्टार फुलबॉलर ‘नेमार’च्या 52 वर्षीय आईचं मुलापेक्षा 6 वर्षानं लहान असलेल्या मॉडलसोबत ‘लफडं’, करतेय डेट

पोलिसनामा ऑनलाइन –ब्राझीलचा स्टार फुटबॉलर नेमार यानं जेव्हा फुटबॉल खेळायला सुरूवात केली तेव्हा त्याच्या आईची इच्छा होती की, तिच्या मुलानं मोठा फुटबॉलर बनावं नाव कमावावं आणि चर्चेत रहावं. परंतु सध्या त्याची आईच चर्चेत आली आहे. याच कारण म्हणजे 52 वर्षीय नादीन गोनकाल्व्स म्णजेच नेमारची आई त्याच्यापेक्षाही 6 वर्षांनी लहान असणाऱ्या मॉडेलला डेट करत आहे. नेमारन यावर शिक्कमोर्तबही केलं आहे.

https://www.instagram.com/p/B-26GxwF476/?utm_source=ig_embed

नादीन हिनं तिच्या इंस्टावरून डेट टियागो रामोस सोबतचा फोटो शेअर केला आहे. दोघं एककमेकांची गळाभेट घेताना दिसत आहेत. रामोस एक प्रोफेशनल गेमर आहे जो 22 वर्षांचा आहे आणि नेमारपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. नादीननं हार्ट इमोजी पोस्ट करत लिहिलं की, हे व्यक्त केलं जाऊ शकत नाही. तुम्ही फक्त हे जगत असता.”

https://www.instagram.com/p/B7E6L0xoya_/?utm_source=ig_embed

नेमारनं जेव्हा त्याचा आईचा हा फोटो पाहिला लगेच यावर कमेंट केली, “तू नेहमी आनंदी रहा आई. खूप सारं प्रेम.” नेमारनंही हार्ट इमोजी पोस्ट केली आहे. नेमारचे आई वडिल 2016 मध्ये एकमेकांपासून वेगळे झाले होते. दोघं 25 वर्ष एकत्र होते. रामोसलाही नेमार खूप आवडतो आणि तो त्याचा फॅनही आहे.